Bangkok To Kolkata Flight : बँकॉकहून (Bangkok) कोलकाताकडे (Kolkata) येणाऱ्या विमानामध्ये दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी (Viral Video) झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशात हजारो फूट उंच उडणाऱ्या विमानामध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. दोन प्रवाशांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. असे अनेक व्हिडीओ याआधीही व्हायरल झाले आहेत. बँकॉकहून कोलकाताकडे येणाऱ्या थाय स्माइल एअरवेजच्या विमानामध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना 27 डिसेंबर रोजी घडल्याची माहिती समोर येत आहे.


मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल


या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानामध्ये दोन प्रवासी एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. एक फ्लाईट अटेंडंट या दोन प्रवाशांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दोन्ही प्रवाशांमध्ये जोरदार बाचाबाची सुरु असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन्ही प्रवाशी एकमेकांवर ओरडताना दिसत आहे. एक प्रवासी दुसऱ्याला 'हँड्स डाउन' म्हणताना ऐकू येतो. हात खाली ठेवा, असे तो वारंवार ओरडताना दिसत आहे. काही वेळातच दोघांमधील हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते.


पाहा व्हायरल व्हिडीओ






तुम्हांला व्हायरल व्हिडीओमध्ये दिसेल की, दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु आहे. फ्लाईट अटेंडेंट हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही प्रवासी एकमेकांवर ओरडत आहेत. यावेळी एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाचा हात धरून त्याच्या कानशिलात मारतो. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु होते. यावेळी इतर काही जणही या भांडणात सामील होतात. त्यानंतर पाच ते सहा जण एका प्रवाशाला मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. विमानात उपस्थित इतर काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.


इंडिगो फ्लाइटमधील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल


या महिन्याच्या सुरुवातीला अशीच एक घटना उघडकीस आली होती. ज्यामध्ये इस्तंबूलहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानामध्ये प्रवासी आणि फ्लाइट अटेंडंट यांच्यातील जोरदार भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा घटना 16 डिसेंबर रोजी घडली होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. लोकांनी या व्हिडीओवर जोरदार कमेंट केल्या होत्या. सोशल मीडियावर काही युजर्सनी कमेंट करत त्यांच्यासोबत विमानात घडलेले किस्से सांगितले होते. काही नेटकऱ्यांनी फ्लाइट अटेंडेंटच्या बाजूने कमेंट केली, तर काहींनी केबिन क्रूच्या वागण्याबाबत संताप आणि नाराजी व्यक्त केली.


या घटनेवर प्रतिक्रिया देताना इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे की, 'आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत आणि प्रवाशांना उत्तम सोय देणे हेच आमचे प्राधान्य राहिल.'