Kerala Wedding Viral Video : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. या आनंदाच्या क्षणी घरातील प्रत्येकजण तितकाच सहभागी असतो. खरंतर वडील आणि मुलीचं नातं हे इतर नात्यांपेक्षा वेगळं असतं. वडील आणि मुलीच्या नात्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगली पसंतीही मिळतेय.
या व्हिडीओमध्ये एक नववधू स्वतःच्या लग्नात मोठ्या आनंदात आणि उत्साहात 'ढोल' वाजवताना दिसत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा मुलगी ढोल वाजवत असते तेव्हा तिचे वडीलही तिच्या आनंदात सहभागी होऊन ढोल वाजवतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ :
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नववधू बिनधास्तपणे चेंडा वाजवताना दिसत आहे. केरळच्या विवाहसोहळ्यांमध्ये चेंडा वाजवणे खूप सामान्य आहे. पण वधूची अशी स्टाईल क्वचितच पाहायला मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा असे या वधूचे नाव असून तिचे वडील व्यवसायाने चेंडा मास्टर आहेत. तो कन्नूर (केरळ) येथील रहिवासी आहेत.
हा व्हिडीओ 26 डिसेंबर रोजी ट्विटर हँडल @LHBCoach ने पोस्ट केला होता. या बातमीला आतापर्यंत एक लाख 69 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 10 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच यावर आपली प्रतिक्रिया देताना अनेक युजर्सनी वधूच्या उत्साहाचे आणि कौतुक देखील केले आहे.
चेंडा म्हणजे काय?
चेंडा हा लाकडापासून बनवलेला पोकळ दंडगोलाकार ड्रम आहे. ज्याच्या दोन्ही बाजू जाड चर्मपत्रांनी झाकलेल्या आहेत. त्याच्या टोकाला जाड लवचिक चामड्याच्या लूपने बांधलेले आहे. हे कंबरेच्या खाली लटकवले जाते आणि दोन वक्र लाकडी काड्यांसह वाजवले जाते. केरळच्या कथकली नृत्य प्रकारासाठी हे एक महत्त्वाचं वाद्य आहे. एवढेच नाही तर मंदिरातील विधी, विवाह यांसारख्या विशेष प्रसंगीही याचा वापर केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :
Viral Video: नवरदेव गळ्यात हार घालणार तितक्यात नवरीनं केलं असं काही; व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले