Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. यापैकी काही लोकांना हसवतात, तर काही व्हिडीओ लोकांना विचार करायला लावतात. सध्या अशाच एका व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये एक तरुण रस्त्याने जाणाऱ्या मुलीला धमकावताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी ती मुलगी त्याला असा धडा शिकवते की, त्याला त्याच्या आजीची आठवण येते.


 


 






 


मुलगी त्याला असा धडा शिकवते की....
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर उभा असलेला एक तरुण कुणाला तरी धमकावत आहे. पुढच्याच क्षणी एक मुलगी पुढे येते, तो तरुण मुलीला कमकुवत समजून धमकावत होता, तीच त्याची मस्ती उतरवेल याची मुलाला जराही कल्पना नव्हती. तुम्ही पाहू शकता की, मुलगी हळू हळू त्या तरुणाच्या दिशेने जाते आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा देते. मग तिथे काय होते? हे पाहून नेटकरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. मुलाला ठोसा मिळताच तिथेच जोरात असा कोसळतो की पुन्हा उठू शकलाच नाही.


पाहा व्हिडीओमध्ये, मुलीच्या एका ठोशामध्ये मुलगा झाला गार


एका तरुणीने तरुणाला धडा शिकवतानाचा व्हिडीओ @streetfighthard या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. मजेशीर कॅप्शन देताना युजरने लिहिले आहे की, या तरुणाची वेळ चांगली नाही. अपलोड केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओला 11 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 35.8 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय लोकं व्हिडिओवर कमेंट आणि शेअर करत आहेत.


नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया


एका युजरने लिहिले आहे की, मुलीने काय जोरदार ठोसा मारला आहे. एका ठोशात गार...! तर, दुसरा युजर म्हणतो, त्या व्यक्तीने ठोसा मारल्यानंतर तो उठलाच नाही. आणखी एका युजरने लिहिले आहे, लो दीदी से पंगा... एकंदरीत, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, प्रत्येकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.


इतर बातम्या


Lesbian Couple Photoshoot: लेस्बियन कपलचे अनोखे फोटोशूट व्हायरल, 'अशी' आहे अदिला-फातिमाची प्रेमकहाणी