Viral Video : सोशल मीडिया (Social Media) हे आजच्या युगात एक असे व्यासपीठ बनले आहे, ज्याच्या माध्यमातून कोणीही रातोरात स्टार बनते. सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) राहणाऱ्या आयेशाचा डान्स व्हिडीओ (Dance Video Viral) सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. खरं तर आयेशाने लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर तिच्या डान्समूव्हने लोकांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे आयेशाची कॉपी करताना लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवत आहेत. यानंतर आता मिस्टर बीनचा (Mr. Bean dance Viral) व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर, तुमचे हसू थांबणार नाही.


 


 






 


 


मिस्टर बीनच्या स्टेप्स अगदी परफेक्ट मॅच 


तुम्ही आतापर्यंत व्हायरल ट्रेंडशी संबंधित अनेक रील्स पाहिल्या असतील, पण ज्या प्रकारे मिस्टर बीनच्या स्टेप्स आणि त्यांचे एक्सप्रेशन लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' गाण्यासोबत एडिट केले गेले आहेत, ते अगदी परफेक्ट मॅच दिसते. मिस्टर बीनचा हा व्हिडिओ त्याच्या 'मिस्टर बीन हॉलिडे' चित्रपटातून घेण्यात आला आहे, ज्यामध्ये तो मजेदार डान्स करून लोकांना हसवत आहे.


3.3 लाखांहून अधिक लोकांकडून लाईक्स


हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर frk.magazine नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 20 नोव्हेंबर रोजी शेअर केलेली ही क्लिप इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 62 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 3.3 लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.



नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
आता हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. एका युजरने लिहिले आहे की, आतापर्यंत मी या ऑडिओवर पाहिलेल्या सर्व व्हिडिओंमध्ये हा सर्वोत्तम आहे. त्याचवेळी दुसरा यूजर म्हणतो, क्या गजब का मैच किया है...! आणखी एक म्हणते, जणू आयशानेच मिस्टर बीनची कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या: