Lesbian Couple Photoshoot : एक अनोखे वेडिंग फोटोशूट (Wedding Photos) सध्या सोशल मीडियावर (Social Media) लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. दोन नववधूंनी हे अनोखे फोटोशूट केले आहे. दोघीही बालपणीच्या मैत्रिणी. अदिला शालेय जीवनात फातिमाच्या प्रेमात पडली होती आणि आता दोघींनीही एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या प्रेमाचा हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंब आणि समाज दोघेही त्यांच्या विरोधात होते. जाणून घ्या दोघींच्या या अनोख्या प्रेमकथेबद्दल.



बारावीत असताना एकमेकांवर जडले प्रेम
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या फातिमा नूरा आणि अदीला नसरीन या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. अदिला बारावीत असताना फातिमावर प्रेम करत होती. त्यानंतर दोघीही सौदी अरेबियात शिकत होते. मात्र, हे नाते त्याच्या कुटुंबीयांना पसंत पडले नाही. त्यांनी या जोडप्याला वेगळे केले. मग त्यांच्यासाठी वराचा शोध सुरू केला. पण फातिमा आणि अदिला यांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. अखेर 19 मे 2022 रोजी दोघीही आपापल्या घरातून पळून गेल्या.


 






 


हक्कासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव 
घरातून पळून गेल्यानंतर फातिमा आणि अदिला यांनी त्यांच्या हक्कासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. जिथे 31 मे रोजी न्यायालयाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली. तेव्हापासून दोघीही चेन्नईत एकत्र राहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघी एका आयटी कंपनीत काम करतात. अलीकडेच फातिमा आणि अदिलाने एक फोटोशूट केले आहे, जे व्हायरल झाले आहे.


एक दिवस दोघी नक्कीच लग्न करतील


हायकोर्टाने दोघांना एकत्र राहण्याची परवानगी दिली असली तरी त्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळणार नाही असं म्हटलंय. मात्र, सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचे दोघींचे म्हणणे आहे. हे कपल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. दोघांना एकत्र राहायचे आहे. या लेस्बियन जोडप्याचे म्हणणे आहे की, कोणी त्यांचे लग्न कायदेशीर मानत असले किंवा नसले तरी ते एक दिवस नक्कीच लग्न करतील.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या: