Viral Video : सध्या सोशल मीडियावर माणसांसोबतच प्राणीही खूप ट्रेंड करत आहेत. काही व्हिडिओ पाहून तर ते प्राणी आहे असे वाटत नाही. कारण त्यांची बुद्धिमत्ता कोणत्याही माणसाप्रमाणेच भासते. या गोंडस प्राण्यांच्या करामती इतक्या मजेदार आहेत की, ते हृदयाला स्पर्श करतात. हे व्हिडीओ पाहून लक्षात येते की, हे प्राणीही किती हुशार आहेत. कुत्रा हा मानवाच्या सर्वात जवळचा पाळीव प्राणी आहे. अशातच कुत्र्याचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जणू कुत्र्याने एका घोड्यावर पैज लावली
आता हा पाळीव कुत्राच पाहा ना... तो चक्क टीव्हीसमोर उड्या मारत आहे जणू काही तो टीव्हीच्या आत आहे. टीव्हीवर सुरू असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर कुत्रा अशा प्रकारे उड्या मारत आहे, की जणू तो स्वत: त्यावर स्वार झाला आहे. खरंतर हा व्हिडीओ ड्रॉईंग रूमचा आहे. जिथे टीव्ही स्क्रीन जोडलेली आहे. आणि त्यावर हॉर्स रेसचा व्हिडीओ वाजतोय. तो व्हिडीओ पाहत आहे. टीव्हीसमोर एक पाळीव कुत्रा दोन पायांवर उभा असलेला दिसतो. आणि घोड्यांची शर्यत पाहून टीव्ही स्टँडवर दोन पाय ठेवून तो इतर दोन पायांपेक्षा अधिक वेगाने उसळतोय. कुत्र्याचा उत्साह असा आहे की जणू त्याने एका घोड्यावर पैज लावली आहे आणि तो जिंकेल अशी अपेक्षा करत आहे.
आनंदी कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल
टीव्ही पाहिल्यानंतर हा कुत्रा कसा आनंदी होत आहे ते पाहा. व्हिडिओमध्ये, हा कुत्रा इतका आनंदी आहे की जणू तो स्वतः टीव्हीच्या आत उपस्थित आहे आणि एकतर घोड्यांच्या शर्यतीत भाग घेत आहे किंवा त्याने स्वतः या शर्यतीत काही पैसे गुंतवले आहेत. या कुत्र्याचे पैसे या शर्यतीत खर्च झाले, असे व्हिडिओचे शीर्षकही दिले होते.
व्हिडीओला खूप पसंती
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला विविध प्रकारच्या कमेंट्स आणि भरपूर लाईक्सही मिळत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. व्हिडीओमध्ये कुत्र्याची करामत पाहून लोक हसून हसून घायाळ होत आहेत.
संबंधित इतर बातम्या
- Coca Cola Maggie : आता 'कोका कोला मॅगी', मॅगीवरील विचित्र प्रयोगावर नेटकऱ्यांचा संताप
Viral Video : गादीवर झोपण्यासाठी हत्तीच्या पिल्लाचे नखरे एकदा पाहाच, तुम्हीही प्रेमात पडाल
Viral Video : आजोबांनी कॉपी केली मायकल जॅक्सनची स्टेप, भन्नाट डान्सचा व्हिडीओ एकदा नक्की पाहा