Trending Video : अनेक रस्ते अपघातांमध्ये माणसांशिवाय वन्य प्राणी जखमी झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. अनेक वेळा अपघातात भरधाव वाहनांची धडक बसून जनावरे गंभीर जखमी होतात. त्याचबरोबर देशात असे अनेक राष्ट्रीय महामार्ग आहेत जे जंगलातून जातात, अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना वाहनांची धडक बसल्याने मोठे अपघात होत आहेत.
...अन् बिबट्या कारच्या बोनेटमध्ये अडकला
नुकतीच अशीच एक घटना घडली आहे, एक बिबट्या कारच्या धडकेत जखमी झाल्याची घटना पहायला मिळाली. धडकेनंतर बिबट्या दूर पडण्याऐवजी कारच्या बोनेटमध्ये अडकला. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिबट्या वेदनेने ओरडताना दिसत आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यासोबतच IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी बिबट्याबद्दल अपडेटही दिले आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अपघातात जखमी होऊनही बिबट्या गाडीच्या बोनेटच्या भागातून मोकळा होताच जंगलात पळताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून यूजर्सनी संताप व्यक्त केलाय.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये बिबट्या रस्त्याच्या अपघातानंतर कारच्या समोर अडकलेला दिसत आहे. बिबट्याला वाचवण्यासाठी कार चालक अत्यंत सावधपणे आपली कार पुढे-मागे करताना दिसत आहे. त्यामुळे बिबट्या गाडीच्या समोरून निसटतो आणि वेगाने जंगलाच्या दिशेने पळतो.
सोशल मीडियावर या व्हिडिओला झपाट्याने 35 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. वन्यजीव कॉरिडॉर आणि अभयारण्यांमधून जाणारे रस्ते बंद करावेत, असे एका यूझरने संतापाने लिहिले आहे.
संबंधित इतर बातम्या