Viral Video : ख्रिसमस (Christmas 2022) हा असा सण आहे, जो भारतासह जगभरात साजरा केला जातो. जगभरात लोक 25 डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत असतातख्रिसमसच्या निमित्ताने लोक ख्रिसमस ट्री तर सजवतात. ख्रिसमसच्या संदर्भात सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा विविध प्रकारचे व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतात, त्यातील काही खूप मजेदारही असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ एमिरेट्स एअरलाइन्सने शेअर केला आहे, जो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही लोकांना धक्काही बसला आहे.


 


या व्हिडीओचे नेमके सत्य काय?
या व्हिडिओमध्ये हरणांचा कळप विमानासोबतच आकाशात उडताना दिसत आबे. हे दृश्य असे आहे की कोणीही ते पाहून हैराण होईल. काही लोकांना या व्हिडीओचे सत्य काय आहे? यावर विश्वासच बसत नाही, ‘हे खरे आहे का?’ असा प्रश्न विचारत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाच्या वर सांताक्लॉजची एक मोठी टोपी घातली आहे. एक हरणांचा कळप ते विमान धावपट्टीवर खेचत आहेत आणि बघता बघता ते आकाशात उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही सेकंदात हरणांचा कळप त्या विमानासह आकाशात उडतो. हे दृश्‍य असे आहे की, हरणांच्या कळपाने खरोखरच विमानासह आकाशात झेप घेतली आहे. हा व्हिडीओ खरोखरच जबरदस्त आहे.


ख्रिसमसचा हा धमाकेदार व्हिडीओ पाहा


 






हा शानदार व्हिडिओ एमिरेट्स एअरलाइन्सने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, 'कॅप्टन क्लॉज, उड्डाणासाठी परवानगीची विनंती करत आहे. अमिरातीकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा. हा व्हिडीओ आतापर्यंत 12 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 1.2 कोटी वेळा पाहिला गेला आहे, तर 6 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे.


नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया


त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'हे खरे आहे की खोटे?', तर दुसऱ्या यूजरने 'त्या फ्लाइटमध्ये मी देखील होतो' असे गमतीने लिहिले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video: पायलट आहे की शायर....या खास शैलीतील अनाऊन्समेंट ऐकून तुम्ही देखील व्हाल खूश; पाहा व्हिडीओ