Army Officer Viral Video: आई आणि मुलाचं नातं हे जिव्हाळ्याचं , प्रेमाचं अन आपुलकीचं प्रतीक मानलं जातं. आपल्या मुलाने आयुष्यात काहीतरी मोठं करावं हे प्रत्यक आईच स्वप्न असतं. मुलगा जेव्हा आईचं स्वप्न पूर्ण करतो त्या दिवसपेक्षा आईसाठी कोणताच मोठा दिवस नसतो, असं म्हणतात. अशाच एका आई-मुलाचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आर्मी ऑफिसर निवृत्तीपूर्वी आईला शेवटचा सॅल्यूट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत.  


सेवेतून निवृत्तीचा दिवस हा प्रत्येकासाठी खूप खास आणि भावनांनी भरलेला असतो. या व्हिडीओमध्ये (Viral Video) भारतीय लष्करातील एक अधिकारी निवृत्तीपूर्वी गणवेश परिधान करून आईला सलाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) मेजर जनरल रंजन महाजन यांनी इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओने (Viral Video) सोशल मीडियावर वेगाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.


या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) लष्कराचे अधिकारी मेजर जनरल रंजन महाजन (Army Officer Viral Video) दाराची बेल वाजवून घरात प्रवेश करताना दिसत आहेत आणि नंतर आईला सलाम करायला जाताना ते दिसत आहेत. ते जेव्हा आईच्या दिशेने पुढे वाढतात, तेव्हा त्यांची आई सोफ्यावरून उठून त्यांना मिठी मारताना दिसत आहे. आई-मुलाला मिठी मारताना पाहून सगळेच भावूक झाले आहेत.






सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) शेअर केल्यानंतर 5 लाख 38 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर नेटकरी खूप भावूक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. जिथे अनेकजण याला खूप भावनिक क्षण म्हणत आहेत. त्याचवेळी काही नेटकऱ्यांनी मेजर जनरल रंजन महाजन (Army Officer Viral Video) यांचे सैन्यातील कारकिर्दीसाठी अभिनंदन केले आहे.