Thunderstorm Viral Video : सोशल मीडीयावर दररोज काहीतरी व्हायरल होत असते. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्याच वेळी, निसर्गाशी संबंधित काही आश्चर्यकारक व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकीत करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. निसर्गाचे सुंदर दृश्य दाखवणारा हा व्हिडीओ खरोखरच अप्रतिम आहे. निसर्गाने स्वतःमध्ये खूप काही सामावले आहे. आपली पृथ्वी ही निसर्गाची देणगी आहे. अशा स्थितीत जेव्हा-जेव्हा निसर्ग आपले महाकाय रूप दाखवतो, तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. कधी कधी नैसर्गिक देखावे इतके सुंदर असतात की ते अद्भूत असतात.


 






 


सुपरसेल वादळाचा अप्रतिम व्हिडिओ


या व्हिडिओमध्ये तुम्ही सुपरसेल वादळाचाा गडगडाट पाहू शकता. सुपरसेल वादळ आकाशात फिरत आहे. सुपरसेल वादळाचा हा व्हिडीओ खूपच अप्रतिम आहे. तुम्ही वादळाच्या मागे सूर्याची किरणे देखील पाहू शकता. आकाशात दिसणारे हे दृश्य खरोखर अप्रतिम आहे. 


27 जून रोजी टिपलेला व्हिडिओ


मिळालेल्या माहितीनुसार, या सुपरसेल वादळाचा हा टाइमलॅप व्हिडिओ जेनी हॅगनने टिपला आहे. ते म्हणाले की, 27 जूनला सूर्यास्त होत असताना हा व्हिडिओ आहे. ते म्हणाले की, व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की आकाशात वादळ उठले आहे आणि सुपरसेल वादळ पुढे सरकत आहे.


संबंधित इतर बातम्या