Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओंमध्ये धोकादायक स्टंट करताना पाहायला मिळतात. अनेकवेळा हे व्हिडीओ फॉलोअर्स वाढविण्यासाठीदेखील केले जातात. यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तीन किंग कोब्रासोबत स्टंट करताना दिसत आहे.
पाहा हा व्हिडीओ :
तीन कोब्रासोबत स्टंट करणं पडलं महागात :
सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ कर्नाटकातील सांगितला जात आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती जीवाची पर्वा न करता कोब्राबरोबर स्टंट करत आहे. तो सापांना अनुकरण करण्यास सांगतो. मेजर सय्यद असे या स्टंट मॅनचे नाव आहे. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती सापांना डिवचण्याचा प्रयत्न करताना स्पष्टपणे दिसत आहे. हा स्टंट मेजर सय्यदसाठी खूप धोकादायक ठरला. तीनपैकी एका नागाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. सापाने त्याच्या पायात चावा घेतला. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना सापांसह स्टंट करणाऱ्या मेजर सय्यद यांच्यावर टीका केली. त्यांनी लिहिले, "कोब्रा हाताळण्याचा हा एक भयानक मार्ग आहे. सापाच्या हालचालींना धोका म्हणून पाहतो आणि काही वेळा ही प्रतिक्रिया घातक ठरू शकते.
स्टंट करणाऱ्या व्यक्तीला नागाने चावा घेतला
स्नेकबाईट हीलिंग अँड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आणि संस्थापक प्रियंका कदम यांनी शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये असे दिसून आले आहे की सय्यद यांना कोब्रा चावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जगातील सर्व ज्ञात कोब्रा विषारी आहेत. साप चावल्यानंतर त्याला कर्नाटकातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळूर येथील साप आणि प्राणी वाचवणारे अतुल पै यांनीही लोकांना अशाच प्रकारच्या स्टंटबाजीपासून सावध केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Trending : तरुणीच्या गालावर 'ती' खळी नाहीच! भन्नाट आयडीया, सोशल मिडियावर ट्रोल
- आतापर्यंत तुम्ही गुलाबजाम खाल्ले आहेत, पण गुलाबजाम पराठा तुम्हाला माहित आहे का? पाहा हा व्हिडीओ
- Viral Video : आलिया भट्टची जादू परदेशातही! आयफेल टॉवरसमोर महिलांनी धरला 'ढोलिडा' गाण्यावर ठेका, पाहा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha