Gulab Jamun Paratha viral food : सध्या सोशल मीडियावर (Social Media) विचित्र खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे स्ट्रीट फूड विक्रेते (Street Food Vendors) घेऊन येत असतात. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या हे स्ट्रीट फूड विक्रेते (Street Food Vendors) जास्तीत जास्त स्वत:ला अपडेट करताना दिसतात. यामुळे त्यांच्याकडूनच खरंतर दोन पदार्थांना मिक्स करून एखादा नवीन पदार्थ तयार होतो. परंतु, हे नवीन पदार्थ प्रत्येक वेळी चविष्ट असतीलच असे नाही.
आजकाल सोशल मीडियावर अशा खाद्यपदार्थांची विपुलता आहे. जी त्यांच्या मूळ स्वरूपापासून पूर्णपणे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बदलली आहे. सध्या, अनेक खाद्यपदार्थांवर वेगवेगळे प्रयोग केलेले व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता (Street Food Vendor) पराठ्याचा अनोखा प्रयोग करताना दिसत आहे. पराठे बनवताना, एक स्ट्रीट फूड विक्रेता बटाटे, कोबी, मटार किंवा इतर कोणताही पदार्थ भरण्याऐवजी त्यात चक्क गुलाबजाम टाकताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा प्रचंड संताप झाला आहे.
हा व्हिडीओ पाहा :
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पिठाच्या गोळ्यात गुलाबजाम टाकून तो लाटून तव्यावर शेकताना दिसत आहे. त्यानंतर गुलाबजामच्या पराठ्यावर साखरेचा पाकही टाकताना दिसतोय. या पराठ्याला सोशल मीडियावर कोणीच पसंत करत नाहीये. या व्हिडीओला अवघ्या काही तासंतच 2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, प्रत्येकजण हे (Weird Food) असल्याचे सांगत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ginger benefits : आल्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, आरोग्याला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
- Health Tips : अॅसिडिटीवर घरगुती उपाय आहे आवळ्याची 'ही' रेसिपी, नियमित सेवनाने पचनक्रिया राहील चांगली
- Health Tips : आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय? मग 'या' टिप्स खास तुमच्यासाठी...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha