Viral Video : आजकाल भारतीय बॉलिवूड गाणी देश-विदेशात सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. याआधी जगभरात सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड गाणी ट्रेंड करताना दिसत आहेत. ज्यामध्ये आलिया भट्टच्या (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी सिनेमाचाही समावेश आहे. आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील 'ढोलिडा' हे गाणे सध्या खूप वेगाने ट्रेंड करत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे पाहा. 


पाहा हा व्हिडीओ :






नुकताच, इन्स्टाग्राम यूजरने तिच्या मैत्रिणींसह पॅरिसमधील आर्क डी ट्रायम्फे आणि आयफेल टॉवरसमोर (Eiffel Tower) ढोलिडा या गाण्यावर मैत्रिणींसह ठेका धरला आहे. यावेळी या महिलांनी पांढरी, केशरी आणि हिरवी साडी नेसली आहे. व्हिडिओमध्ये तिन्ही महिलांचा धमाकेदार डान्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळतोय.     


अभिनेत्री आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक संजय लीला भासाळी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, शंतनू माहेश्वरी, सीमा पाहवा हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट आजकाल लोकांचे भरपूर मनोरंजन करत असल्याचे दिसते.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha