Trending News :  अनेक वेळा कपल हे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. तर काही वेळा रिलेशनशिपमध्ये असणारे कपल हे कँडल लाइट डिनर किंवा मूव्ही डेटसाठी देखील जातात. अशाच एक डेटचा भन्नाट किस्सा आयरलँडमधील (Ireland)  Cork शहरामध्ये घडला आहे. एक तरूण मुलगा एका मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्यानंतर अचानक त्यानं तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या मुलानं इमारतीवरून का उडी मारली असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात कारण... 


आयरलँडमधील एक मुलगा डेटसाठी एका मुलीच्या घरी गेला. तेव्हा त्या मुलीच्या घरी कोणी नव्हते. त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर त्या मुलाला कोणी तरी घरात येत आहे, असा भास झाला. त्या मुलाला वाटलं की त्या मुलाची बॉयफ्रेंड आला आहे. त्यामुळे पळून जाण्यासाठी त्या मुलानं तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.


 नंतर असं लक्षात आलं की त्या मुलीच्या शेजारी राहणारा व्यक्ती त्याच्या कुत्र्याला घेऊन फिरत होता. त्यामुळे त्या मुलाला कोणी तरी घरात येत आहे असा भास झाला.  त्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जवळपास राहणाऱ्या लोकांनी रूग्णवाहिकेला फोन केला. त्या मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं, त्याचे पाय फ्रँक्चर झाले होते. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha