Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी फूड डिलिव्हरी बॉयला चक्क चपलेने मारहाण करताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे. मुलगी तिच्या स्कूटीवरून चौकातून जात होती. या दरम्यान डिलिव्हरी बॉय चुकीच्या बाजूने गाडी चालवत होता आणि त्याने तिच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. यावरून मुलीचा प्रचंड संताप झाला. 


पाहा हा व्हिडीओ : 






तरुणीने रस्त्याच्या मधोमध फूड डिलिव्हरी बॉयला चपलेने केली मारहाण


स्कूटीच्या धडकेने मुलगी रस्त्यावर पडली होती. त्यानंतर ती उठली आणि तिने लगेचच दुचाकीस्वाराला बूटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीने तिच्या स्कूटीला धडक दिल्याने तिला दुखापत झाल्याचा आरोप मुलीने केला आहे. व्हिडीओमध्ये मुलगी डिलिव्हरी बॉयला चपलेने सतत मारहाण करताना दिसत आहे. तेथे उपस्थित काही लोकांनी महिलेला तसे करण्यास मनाई केली मात्र मुलीने ऐकले नाही. 


आजूबाजूचे लोक मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण तिने कोणाचेच ऐकले नाही. ती तरुणाला सतत मारहाण करत होती. मात्र, घटनेच्या वेळी मुलगी फोनवर बोलत होती आणि त्यामुळेच ही टक्कर झाल्याचा दावा काही स्थानिक लोकांनी केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ओमटी पोलिस स्टेशनचे प्रभारी एसपीएस बघेल म्हणाले की, या प्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाही. बघेल म्हणाले की, या घटनेची तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.


महत्वाच्या बातम्या :