Kili Paul Viral Video : टांझानियाचा इंटरनेट सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) बॉलिवूड चित्रपट तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांची गाणी आणि डायलॉगवर नेहमी व्हिडीओ बनवताना पाहायला मिळतो. पारंपारिक मसाई ड्रेसमध्ये दिसणारी किली पॉल त्याच्या व्हिडीओंमुळे कायम चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत वेगवेगळे बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांवर व्हिडीओ बनवले आहेत. तो वेगळ्या शैलीनं भारतीयांची मनं जिंकताना दिसतो. 


किली पॉलला नुकताच टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने (High Commission of India) हिंदी चित्रपट तसेच दक्षिणात्य चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर व्हिडीओ बनवल्याबद्दल सन्मानित केलं आहे. किलीने यावेळी आपल्या वेगळ्या स्टाईलने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. यावेळी तो सुपरस्टार यशच्या चित्रपट 'KGF Chapter 2' चित्रपटातील डायलॉगवर लिप-सिंकसह जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.







सुपरस्टार यशचा 'KGF Chapter 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील एका डायलॉगवर तो किली पॉलशी लिपसिंक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ यूजर्सना खूपच आवडला आहे. किली पॉलच्या या व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3.4 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 6 लाख युजर्सनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेक युजर्सने किलीचं कौतुक केलं आहे. याआधी त्याचा किंग खानच्या 'कल हो ना हो' गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha