Viral Video : आजकाल देशभरातील स्ट्रीट फूड विक्रेते नवीन खाद्यपदार्थ शोधताना दिसत आहेत. जे फूड ब्लॉगरच्या माध्यमातून सोशल मीडियावर दिसून येत आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते सतत दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे मिश्रण करून नवीन पदार्थ बनवताना दिसतात. जे अनेक वेळा नेटकऱ्यांना अजिबात आवडत नाही. 


देशभरात मोमोसचे (Momo) खवय्ये अनेक आहेत. मोमोसचे वेगवेगळे पदार्थ त्यांना खायला खूप आवडतात. तरूणांमध्ये मोमोसची तर प्रचंड क्रेझ आहे. मोमो हा स्ट्रीट फूडमधला एक महत्वाचा पदार्थ आहे. देशाच्या अनेक भागात व्हेज, नॉनव्हेज तसेच अनेक प्रकारचे मोमोज उपलब्ध आहेत. ज्याला मोठ्या प्रमाणात लोकांनी पसंती देखील दिली आहे. अलीकडेच एक स्ट्रीट फूड विक्रेता मोमोजचा विचित्र प्रयोग करताना दिसत आहे. जे पाहून नेटकरी भयंकर संतापले आहेत. 


पाहा हा व्हिडीओ : 


 






 


अलीकडेच एक व्यक्ती 'स्वीट मोमो' बनवताना दिसत आहे. जे पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती मोमोज बनवण्यासाठी सर्वात आधी पीठ तयार करतो. त्यानंतर त्यावर अनेक प्रकारची मिठाई ठेवतो. ज्यावर तो शेवटी गाजराचा हलवाही ठेवताना दिसत आहे. हे सर्व केल्यानंतर, तो मोमोजचा आकार देऊन त्यांना वाफेवर शिजवण्यासाठी ठेवतो.


सर्वात शेवटी हा विक्रेता त्यावर चॉकलेट सिरमसह मोमोज सर्व्ह करतो. जे एक व्यक्ती खाताना देखील दिसत आहे. सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एका युजरने म्हटले आहे की, हा डायबेटिस बॉम्बसारखा दिसतो. त्याच वेळी, दुसरा म्हणतो की तो देवाच्या सांगण्यावरूनही खाणार नाही.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha