Viral Photo: इंटरनेटच्या जगात असे अनेक फोटो व्हायरल (Viral Photo on Social Media) होतात, जी पाहिल्यानंतर लोक गोंधळून जातात. अनेकवेळा असं घडतं की एखादा फोटो पाहिल्यानंतर लोकांना त्यात नेमकं काय आहे हेच समजत नाही, त्या फोटोतील सत्य कळत नाही. बर, एवढच नाही तर लोकांच्या गोंधळात त्यामुळे अधिकची भर पडते. आजही सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हाताच्या ठशाप्रमाणे दिसणाऱ्या या फोटोमध्ये एक संख्या लपलेली आहे. पण ही संख्या नेमकी काय आहे, या चित्रात लपलेले आकडे नेमके कोणते आहेत याचा अंदाज काही लोकांना येत नाही. या फोटोतील संख्या ओळखा असं चॅलेंज सोशल मीडियावर दिलं गेलंय. ते चॅलेंजही अनेकांनी स्वीकारलं आहे.
Viral Photo on Social Media: अनेकजण चक्रावले
या फोटोतील नेमकी संख्या काय आहे याचा मात्र अनेकांना काही अंदाज येत नसल्याचं दिसून येतंय. उलट या फोटोकडे काही सेकंद सलग पाहिल्यानंतर चक्रावल्यासारखी स्थिती निर्माण होतेय असं काही लोकांनी सांगितलं. सुरुवातीचे काही आकडे दिसतात, पण सलग पाहायला गेल्यानंतर गोंधळात भर पडत असल्याचं काहीजणांनी सांगितलं.
हा फोटो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकजण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत. या चित्रात किती आकडे दडले आहेत हेच नेमकं लक्षात येत नाही. अनेकांनी हा फोटो पाहण्याचा प्रयत्न केला. फोटो सलगपणे पाहिल्यानंतर डोळे गरगरत असल्याचं काहीजणांनी सांगितलं. 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ सतत पाहिल्यानंतर तुमचे डोळे पूर्णपणे बंद होतील.
व्हायरल होत असलेला हा फोटो SJoseph Burns नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या चित्रावर अनेकांनी आपली उत्तरे दिली आहेत. तुम्हाला जे वाटत असेल ते तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. सध्या यूजर्सनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ही बातमी वाचा: