Lottery Prize Viral News : कोणत्याही व्यक्तीचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही, असे म्हणतात देव जेव्हा देतो तेव्हा तो भरभरून देतो.  याचेच उदाहरण म्हणजे एका सफाई कामगाराला चक्क 50 लाखांची लॉटरी लागली आहे. हा सफाई कामगार गेल्या 25 वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता. आता त्यांच्या 25 वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले हे त्याचे नशीबच म्हणावे लागेल.


लॉटरीच्या तिकिटावर 50 लाखांचे बक्षीस जिंकले


लॉटरी जिंकणाऱ्या सफाई कामगाराचे नाव तरसेम लाल आहे. पंजाब राज्याच्या लॉटरीच्या तिकिटावर त्याने 50 लाखांचे बक्षीस जिंकले आहे. तरसेम म्हणाला की, लॉटरी नक्कीच जिंकली पण त्याने हे तिकीट त्याची पत्नी राजराणी हिला दिले आणि यामधून कितीही पैसे जिंकले ते तिचेच असेल असे सांगितले. तरसेम लाल यांनी स्थानिक बसस्थानकावरून लॉटरीचे तिकीट काढले होते.


अशिक्षित आहे तरसेम लाल 


हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की तरसेम लाल हा एक अशिक्षित आहे. स्थानिक बसस्थानकाजवळील एका लॉटरी स्टॉलवरून त्यांनी हे तिकीट खरेदी केल्याचे सांगितले. हा स्टॉल चालवणाऱ्या लॉटरी विक्रेत्या संजीव कुमारचा प्रामाणिकपणा होता की त्याने तरसेमच्या अशिक्षितपणाचा फायदा घेतला नाही आणि त्याला लॉटरीचे बक्षीस जिंकल्याची माहिती दिली. तरसेमने सांगितले की, तो गेल्या 25 वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता, पण पहिल्यांदाच त्याला हे बक्षीस मिळाले. जेव्हा त्याने लॉटरीचे तिकीट घेतले तेव्हा त्याच्या खिशात फक्त 100 रुपये होते.


येथे खर्च करणार लॉटरीचे बक्षीस 


लॉटरी जिंकल्यानंतर बोलताना तरसेम लाल याने सांगितले की, बंपर बक्षीसमध्ये एवढी मोठी रक्कम जिंकेन असे मला कधीच वाटले नव्हते. त्याच्यावर सुमारे 10 लाख रुपयांचे कर्ज आहे, ते फेडून तो आपल्या मुलीचे लग्न करणार आहे. यासोबतच आपल्या मुलासाठी ते दुकान उघडतील तसेच म्हातारपणासाठी काही पैसे वाचवतील. त्याला चांगली रक्कम मिळाली असली तरी तो साफसफाईचे काम सोडणार नाही.


भीक मागणाऱ्या महिलेनं जिंकली 10 कोटींची लॉटरी


अशीच एक घटना समोर आली होती. बँकेबाहेर भीक मागणाऱ्या एक महिला कोट्यधीश झाली आहे. या महिलेला तब्बल 10 कोटींची लॉटरी लागली आहे. स्पेन (Spain) मधील एका महिलेचं नशीब चांगलंच फळफळलं. बँक बाहेर भीक मागणाऱ्या महिलेली 10 कोटींची बंपर लॉटरी लागली आहे. या महिलेनं एका तंबाखूच्या दुकानातून लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) खरेदी केलं होतं. ती नेहमी लॉटरीचं तिकीट खरेदी करायची, मात्र यावेळी या महिलेनं नशीब काढलं आणि 10 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या