Ganesh Utsav : थायलंडमध्ये आहेत सर्वात मोठ्या गणेश मूर्ती; जाणून घ्या देशविदेशातील महत्वाच्या गणपतींबाबत...
इंडोनेशियातील बालीमध्ये गणेशाची भव्य मूर्ती आहे. मेंजांगनपुरा सेगारा गिरी धर्म केनकाना, मेंजांगन बेट, बुलेलेंग रीजेंसीमध्ये ही खास मूर्ती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथायलंडमध्येच वाट फ्रॉन्ग अकाटमध्ये हा गणेश विराजमान आहे. हा गणपती तब्बल 49 मीटर उंच आणि 19 मीटर रुंद आहे.
जगातील सर्वात उंच गणेशाची मूर्ती ही थायलंडमध्ये आहे. ही गणेशमूर्ती 129 फूट उंच आहे. थायलंडमधील ख्लोंग खुआन येथे ही मूर्ती आहे.
थायलंडमध्ये चाचोएंगसाओ येथील वाट समान रतनराम येथे हा गणपती आहे. हा गणपती 16 मीटर उंच आणि 22 मीटर रुंद आहे.
नागपूरचे ग्रामदैवत असा मान असलेला टेकडी गणपती.या गणेशाच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविकही उपस्थित असतात. नागपूरच्या सीताबर्डी परिसरातला टेकडी गणपती मंदिर नागपूरकरांचं श्रद्धास्थान आहे.
गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा गणपती देखील खूप प्रसिद्ध आहे. या मुंबईच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची खूप गर्दी असते.
मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणजे सिद्धीविनायक. सिद्धिविनायक मंदिर प्रत्येक गणेश भक्ताचं श्रद्धास्थान आहे. अगदी सामान्य माणसांपासून मोठ-मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिर 18 व्या शतकात 1801 मध्ये बांधलं गेलं. हे मंदिर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिराला ‘नवसाचा गणपती’ असंही म्हटलं जाते.
लालबागच्या राजा हा मुंबईसह देशभरात प्रसिद्ध गणपती आहे. यंदा लालबागच्या राजासमोर राम मंदिर साकारलं गेलं आहे.
दगडूशेठ गणपती मंदिराला शतकाहून अधिक काळाचा समृद्ध इतिहास आहे. ही मूर्ती 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद मूर्ती सुमारे आठ किलो सोन्याने सजलेली आहे. 1800 च्या उत्तरार्धात, दगडूशेठ गडवे एक मिठाई विक्रेते आणि एक श्रीमंत व्यापारी यांनी प्लेगच्या साथीने आपला मुलगा गमावला. यामुळे दगडूशेठ आणि त्यांची पत्नी नैराश्यात गेले. नैराश्यातून मुक्त होण्यासाठी त्यांचे गुरू श्री माधवनाथ महाराज यांनी त्यांना गणेश मंदिर बांधण्यास सांगितलं. 1893 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. समाजसुधारक लोकमान्य टिळक हे दगडूशेठ यांचे जवळचे मित्र होते आणि इथेच गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना टिळकांच्या मनात आली. त्यानंतर येथील गणपती मंदिर प्रसिद्ध झालं.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील खजराना मंदिराला विशेष महत्त्व आहे. हे मंदिर मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. खजराना मंदिरात गणेशाची तीन फुटी मूर्ती आहे. ही मूर्ती जवळच्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली.