Viral: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) सध्या चर्चेत आहे. याच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले टी-शर्ट ऑनलाईन विकले जात असल्याचं समोर आलंय, ज्यामुळे काही वेबसाइट्सना चांगलंच महागात पडलंय. या संदर्भात सोशल मीडियावर निषेधाची मालिकाही सुरू झालीय. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Meesho, Flipkart आणि Teeshopper यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले टी-शर्ट विकल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागलाय. एका सोशल मीडिया यूजरने प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या या टी-शर्टचा स्क्रीनशॉट शेअर केल्यावर ही बाब समोर आली. लोकांचा संताप पाहता संबंधित वेबसाईट्सवरून हे टी-शर्ट हटविण्यात आले आहेत.


प्रौढांसाठी, मुलांसाठीही हे टी-शर्ट उपलब्ध


X वरील एका पोस्टमध्ये, व्यवसायाने पत्रकार असलेल्या अलिशान जाफरी यांनी सांगितले की, Meesho आणि Teeshopper सारख्या इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले टी-शर्ट विकले जात आहेत, त्यापैकी काहींवर "गँगस्टर" हा शब्द देखील लिहिलेला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी हे देखील लिहिले आहे की टी-शर्ट फक्त 168 रुपयांना उपलब्ध आहेत. हे प्रौढांसाठी तसेच मुलांसाठी उपलब्ध आहेत. माहितीनुसार, मीशोच्या वेबसाइटनुसार, विक्रीसाठी उपलब्ध टी-शर्टची किंमत 166 रुपयांपासून ते 177 रुपयांपर्यंत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने हे देखील लिहिले आहे की टी-शर्ट फक्त 168 रुपयांना उपलब्ध आहेत. मीशोच्या वेबसाइटनुसार, विक्रीसाठी उपलब्ध टी-शर्टची किंमत 166 रुपयांपासून ते 177 रुपयांपर्यंत आहे.






 


इतर काही ई-कॉमर्स साइटवर देखील उपलब्ध


मीशो व्यतिरिक्त, टी-शर्ट फ्लिपकार्ट आणि इतर काही ई-कॉमर्स साइटवर देखील उपलब्ध आहेत. यावरून वाद निर्माण झाला आहे. गुंडांना प्रोत्साहन देण्यासाठी यूजर्स या प्लॅटफॉर्मवर टीका करत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अद्याप या विषयावर कोणतेही विधान जारी केलेले नव्हते. मात्र मीशोने यावर आपलं मत व्यक्त केलंय


Meesho कडून मत व्यक्त


यूजरने संबंधित पोस्ट शेअर करताना यासोबतच त्यांनी मीशो ॲपच्या पेजचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई प्रिंटेड मुलांचा टी-शर्ट 211 रुपयांना विकला जात आहे, तर मुलांचा आणि पुरुषांचा टी-शर्ट 168 रुपयांना विकला जात आहे. याप्रकरणी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने सांगितले की, कारवाई करत आम्ही हे प्रॉडक्ट वेबसाइट आणि ॲपवरून काढून टाकले आहे. ते पुढे म्हणाले की, मीशो आपल्या सर्व यूजर्सना सुरक्षित आणि विश्वासार्ह शॉपिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. लॉरेन्स विश्नोई 2015 पासून तुरुंगात आहेत. त्याच्यावर खंडणी आणि खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काही काळापूर्वी सलमान खानला मारण्याची धमकी दिल्याने तो खूप चर्चेत होता.


लॉरेन्स बिश्नोई 70 हून अधिक गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित


सध्या साबरमती तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याविरुद्ध भारताच्या दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर 70 हून अधिक गुन्हेगारी प्रकरणे आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या आणि बॉलीवूड स्टार सलमान खानला धमक्या देणे यासह अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये त्याच्या टोळीचा सहभाग आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी संबंध असल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिस सध्या बिष्णोईची चौकशी करत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अद्याप या विषयावर कोणतेही विधान जारी केलेले नाही.


हेही वाचा>>>


Viral: 'बाई...काय प्रकार!' देवाचे चरणामृत समजून, भक्त AC चं पाणी पितायत? 'या' मंदिरातील भाविकांचा व्हिडीओ व्हायरल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )