Viral: भारतात विविध धर्मांची अनेक मंदिरं आहेत. जिथे भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या लाडक्या देवाला पाहण्यास येतात. भारतातील असं एक मंदिर आहे. जिथे गर्दीमुळे अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील भक्त चक्क एसीमधून बाहेर पडणारे पाणी प्रसाद मानून पीत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.


देवाचे चरणामृत समजून पितायत AC चे पाणी? व्हिडीओ व्हायरल


त्याचं झालं असं की, मथुरेच्या बांके बिहारी मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. या मंदिरात अनेकदा गर्दी दिसून येते. या मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका ठिकाणाहून पाणी बाहेर येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. लोक याला देवाचे चरणामृत तसेच प्रसाद मानून पीत आहेत, व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे की, हा प्रसाद नसून मंदिरात लावलेल्या एसीचे पाणी आहे. जे भाविक अगदी प्रसाद मानून पिताना दिसत आहेत.






व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया


या व्हायरल व्हिडीओची पुष्टी आम्ही करत नाही. असे सांगितले जात आहे की, एका भक्ताने हे केले आणि नंतर इतरांनीही ते प्रसाद समजून प्यायला सुरुवात केली. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने कमेंटमध्ये म्हटले की, किमान मंदिराने याबाबत नोटीस तरी चिकटवावी आणि लोकांना याबाबत सावध केले पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की, आता त्यांना कोण समजावणार, जेव्हा ते स्वतःच आंधळ्या भक्तीत मग्न आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, एसीच्या पाण्याची चव वेगळी असते, त्यांना का कळत नाही?


'शिक्षित असणे पुरेसे नाही, तर...!' नेटकरी म्हणतात...


एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, अशा प्रकारचे पाणी प्यायल्याने संसर्ग होऊ शकतो. एखादी व्यक्ती आजारी पडू शकते. त्यांना कोणी समजावत का नाही? एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की शिक्षित असणे पुरेसे नाही परंतु तर्कशुद्ध असणे खूप महत्वाचे आहे. दुसऱ्याने लिहिले की लोक शिक्षित असूनही अशा चुका का करतात? अशा प्रकारच्या विविध कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा>>>


Lifestyle: 'सब मोह माया है, मग हातात 2 लाखाची चामड्याची बॅग कशी?' जया किशोरी 'त्या' बॅगमुळे ट्रोल, स्वत: सांगितलं सत्य! 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )