Viral: असं म्हणतात की नवरा बायको यांच्यातील वाद थोड्या काळासाठी असतात, थोड्या वेळानंतर ते एकमेकांशी बोलायला लागतात. कारण त्यांच्यात प्रेमही तितकेच असते. ते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, सध्या सोशल मीडियावर पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला चक्क ट्रेनमधून उडी मारताना दिसत आहे. ही घटना मध्य-प्रदेशातील असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चालत्या ट्रेनमधून महिलेची उडी.. काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील ओरई आणि अटा स्थानका दरम्यान धावणाऱ्या बरौनी एक्स्प्रेसमधील ही घटना आहे. ट्रेनमध्ये प्रवासी मोठ्या संख्येने आहेत, बसायला जागा दिसत नाही, त्यामुळे ट्रेनच्या गेटवरही अनेकजण बसलेले आहेत. महिला तिच्या पतीसोबत रेल्वेच्या दरवाजाजवळ होती, पण काही कारणावरून ट्रेनमध्येच पती-पत्नीमध्ये वाद झाला. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद ट्रेनमधील प्रवासी पाहत होते. काहीजण त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करत होते. या वादात महिला अचानक गेटजवळ जाऊन दाराला लटकली. यावेळी तिला तिचा हात गमवावा लागला आणि ती चालत्या ट्रेनमधून खाली पडली. महिला खाली पडल्याची घटना घडताच ट्रेनच्या डब्ब्यात एकच गोंधळ उडाला.
नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया
गेटजवळ उभी असलेली काही मुलेही रडताना दिसत आहेत. जणू ती त्या महिलेचीच मुलं आहेत. दारू पिऊन भांडण करत चालत्या ट्रेनमधून उडी मारली, असंही एका प्रवाशाला ऐकायला मिळतं. यानंतर ट्रेन थांबवण्यात आली मात्र महिलेचा जीव वाचला की नाही हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही लोक म्हणतात की पतीने जाणूनबुजून आपल्या पत्नीला ट्रेनमधून उडी मारण्याची परवानगी दिली, तर काही लोक म्हणतात की दारू पिऊन आणि भांडण झाल्यावर तिने स्वतः उडी मारली. या व्हिडीओमध्ये घडलेल्या घटनेमुळे धक्का बसलेले प्रवासी आणि त्रासलेली मुले स्पष्टपणे दिसत आहेत.
हेही वाचा>>>
Viral: 'बाई...काय प्रकार!' देवाचे चरणामृत समजून, भक्त AC चं पाणी पितायत? 'या' मंदिरातील भाविकांचा व्हिडीओ व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )