UP Police Video Viral :  लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत (Traffic Rules) जागरूक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार (UP Government) वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवते, जेणेकरून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होतील. यासाठी पोलिसांसह वाहतूक विभागाचे अधिकारीही जोमाने कामाला लागले आहेत, मात्र ज्यांच्यावर सुरक्षिततेची जबाबदारी आहे, तेच वाहतूक कायद्याचे उल्लंघन करण्यात मग्न आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल (Viral Video On Social Media) होतोय. जेथे खुद्द पोलीसच स्टंटबाजी करताना दिसत आहे. 


भरधाव वेगाने दुचाकीवर बिनधास्त स्टंटबाजी
उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे, जिथे पोलिसांचा गणवेश घातलेली एक व्यक्ती चक्क भरधाव वेगाने दुचाकीवर स्टंट करताना दिसली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गया येथील पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.


व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत यूपीमध्ये ट्रॅफिक मन्थ म्हणजेच वाहतूक जनजागृती महिना साजरा केला जातो. या दरम्यान पोलीस कर्मचारी सर्व लोकांना वाहतुकीबाबत जागरूक करतात, जेणेकरून अपघातांना आळा बसेल. मात्र काही पोलीस याच दरम्यान स्टंटबाजी करण्यात मग्न आहेत. असाच एक व्हिडीओ जालौन-औरैया राज्यातून समोर आला आहे, ज्यामध्ये एक गणवेशधारी पोलीस राज्य महामार्गावर दुचाकीने स्टंटबाजी करताना दिसत आहे.


हेल्मेटशिवाय दुचाकीवर स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद


पोलीस स्टंटमॅनचा व्हायरल झालेला व्हिडीओ हद्रुख आणि मदारीपूर गावातील आहे. हा पोलीस बाईक चालवत रस्त्याच्या मधोमध स्टंटबाजी करताना दिसत आहे. ही व्यक्ती 80 किमी प्रती तास या वेगाने दुचाकी चालवताना दिसतेय. तसेच हा स्टंट चक्क हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे,  भरधाव वेगात दुचाकीवर दोन्ही हात सोडून रस्त्याच्या मधोमध स्टंटबाजी करताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अवघ्या काही मिनीटातच व्हायरलही झाला. गणवेशधारी व्यक्ती जी बाईक चालवत होती, तिचा नंबर हमीरपूर जिल्ह्यातील सांगितला जात आहे, मात्र हा पोलीस कुथुंड पोलीस स्टेशन परिसरात ड्युटीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून, पोलिस अधिकारी या गणवेशधारी व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video : श्वानाने केली गणपतीची मनोभावे पूजा, मंदिराबाहेर असे काही केले, व्हिडीओने जिंकली लोकांची मने