Trending Dog Video : प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ (Animals Viral Videos) सर्वांनाच आवडतात. सोशल मीडियावर (Social Media) दररोज लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात, अनेकवेळा प्राणी असे काही करतात जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित होतात. त्यापैकी केव्हा, काय व्हायरल होईल? हे काही सांगता येत नाही. एका श्वानाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे,  जो भगवान गणेशाच्या मुर्तीसमोर असे काही करतो, ज्यामुळे नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. 


 






युजर्सच्या हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ
सोशल मीडीयावर अनेक व्हिडीओ विविध गोष्टींमुळे व्हायरल होतात. असे बरेच व्हिडीओ आहेत, जे त्यांच्या उत्कृष्ट कंटेटमुळे युजर्सच्या हृदयाला स्पर्श करतात. अशीच एक रील इंस्टाग्रामवर व्हायरल झाली, जी पाहून सगळेच हैराण झाले. या क्लिपमध्ये एक श्वान मंदिरात देवाची पूजा करताना दिसत आहे. बाप्पाच्या मूर्ती पुढे हा श्वान त्याच्या पुढच्या दोन्ही पायांवर झुकलेला दिसतो आणि त्याचा मालकही त्याच्यासोबत तिथे असतो. दोघेही देवासमोर भक्तीत तल्लीन झालेले दिसतात


श्वानाकडून गणेशाची मनोभावे पूजा 


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, देवाची पूजा करण्यासाठी हा श्वान कसा मंदिराबाहेर श्रद्धेने नतमस्तक होतो. श्वानासोबत असलेल्या माणसानेही देवाला नमस्कार केला आणि दोघेही बराच वेळ तिथे उभे राहिले. हा व्हिडीओ पाहून असे वाटते की, श्वानाला गणेशाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले पाहून हा क्षण इथल्या काही लोकांनी रेकॉर्ड केला आहे.


व्हिडिओला मिलीयन व्ह्यूज


या व्हिडीओचे लोकेशन कळू शकले नाही, मात्र कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने हे गणपती मंदिर पुण्यात असल्याचे सांगितले आहे. त्याने लिहिले की, "त्याचे नाव विशाल आहे, तुम्ही त्याला दगडूशेठ गणपती मंदिर, पुणे जवळ पाहू शकता." हा अनोखा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Viral Video : 'फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!