Trending News : पाळीव प्राणी त्यांच्या मालकांच्या अगदी जवळ असतात आणि काही लोक त्यांना त्यांच्या मुलांप्रमाणेच ठेवतात आणि त्यांच्याशी समान वागणूक देतात. देशाची राजधानी दिल्लीजवळील गुरुग्राममधील एका छोट्याशा परिसरात रविवारी सर्वांनाच अचंबित करणारी गोष्ट घडली. या दिवशी गुरुग्रामध्ये एक असा विवाह पार पडला ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि झालाही नव्हता. गुरुग्राममध्ये एका श्वान जोडप्याचा विवाह करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात शेजाऱ्यांनीही 'वराती' म्हणून पूर्ण रितीरिवाजाने सहभाग घेतला. 


पाहा व्हिडीओ : 



व्हायरल होत असलेल्या या रंजक व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नाची सर्व तयारी सुरू आहे आणि "सेरू वेड्स स्वीटी" नावाची कार्डे देखील छापली गेली आहेत आणि शेजारी आणि नातेवाईकांना पाठवण्यात आली आहेत. जे या अनोख्या लग्नाला वराती म्हणून उपस्थित राहताना दिसतात. गुरुग्राममधील हे जोडपे त्यांच्या पाळीव कुत्र्याचे पारंपारिक लग्न ढोल, पेढे आणि वरात्यांनी पार पाडताना दिसत आहे.





वरात्यांची श्वानाच्या लग्नाला हजेरी लावली होती


एका श्वानाच्या लग्नाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, ऑनलाईन चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये, पाळीव प्राण्यांच्या मालकांनी 100 आमंत्रण पत्रिका देखील छापल्या आणि शेजाऱ्यांना आमंत्रणदेखील दिलं. हे शेजारी या लग्नसमारंभाला एखाद्या वरात्यांप्रमाणे उपस्थित होते. या लग्नाची पद्धत, रितीरिवाज पाहून हे लग्न खरंच एका श्वानाचं आहे का? असं प्रश्न पडतो.  


लोकांना आवडलं अनोखं लग्न


लग्नाचा हा मनोरंजक व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने यूट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला अनेक यूजर्सकडून भरभरून प्रेमदेखील मिळतंय. या लग्नामुळे अनेकजण अचंबित झाले. तसेच, काहींना आनंदही झाला. मात्र, जे खरे श्वानप्रेमी आहेत. त्यांना हा व्हिडीओ जास्त भावला.  


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video : श्वानाने केली गणपतीची मनोभावे पूजा, मंदिराबाहेर असे काही केले, व्हिडीओने जिंकली लोकांची मने