Video Viral : पती-पत्नीचे (Husband-Wife) नाते केवळ प्रेमावर अवलंबून असते. प्रेम नसेल तर नात्यालाही काही अर्थ नाही. अशा परिस्थितीत अनेकदा जोडपे वेगळे होतात. भारतात, अनेक जोडपी अशी आहेत, जे एकमेकांना आयुष्यभर साथ देतात आणि त्यांच्यातील प्रेम नेहमीच टिकते. तरुणपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत एकमेकांवर तितकेच प्रेम करतात. त्यांच्या प्रेमात कोणतीही कमतरता नसते. सोशल मीडीयावरही (Social Media) अशा वृद्ध जोडप्यांशी संबंधित व्हिडीओ (Viral Video) अनेकदा व्हायरल होतात, जे हृदयाला स्पर्श करतात. आजकाल असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचे मन आनंदित होईल


 






 


नववधूप्रमाणे सजलेल्या आजीला पाहून आजोबा आश्चर्यचकित
या व्हिडिओमध्ये एक आजी नववधूप्रमाणे सजलेली दिसत आहे आणि तिला पाहून आजोबांनी जी प्रतिक्रिया दिली ती खूपच आश्चर्यकारक होती. कदाचित त्याच्या डोळ्यातही अश्रू आले असतील, जे ते पुसण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजोबा आपल्या पत्नीला वधूप्रमाणे सजवलेले पाहून आनंदाने कसे टाळ्या वाजवत आहेत, तर दुसरीकडे आजी देखील खूप आनंदी दिसत आहेत. त्यानंतर आजोबा त्यांच्या पत्नीकडे येतात आणि तिची ओढणी व्यवस्थित करतात, मग सोफ्यावर आरामात बसतात. म्हातारपणातही या जोडप्यामधील इतकं प्रेम पाहून तुमचेही डोळे भरून येतील. हा सुंदर छोटा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.


वृद्ध जोडप्याचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ


हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'देविकालाला' नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 3.2 दशलक्ष म्हणजेच 32 लाख वेळा पाहिले गेले आहे, तर 4 लाख 37 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Viral Video : 'फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!