Apple AirTag : ॲपलमुळे ( Apple ) एका महिलेला तिचा हरवलेला कुत्रा ( Dog ) सापडला आहे. ॲपल डिव्हाईसमुळे ( Apple Device ) या महिलेला तिचा कुत्रा शोधण्यात मदत झाली. ॲपल कंपनीच्या या उपकरणामुळे अनेक लोकांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू शोधण्यात मदत झाली आहे. ॲपलचं हे डिव्हाईस अत्यंत उपयुक्त आहे. या उपकरणाचं नाव ॲपल एअरटॅग ( Apple AirTag ) आहे. एका नव्या मीडिया रिपोर्टनुसार, ॲपल एअरटॅगमुळे महिलेला तिचा हरवलेला कुत्रा सापडला.


AppleInsider च्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडामध्ये एका महिलेचा कुत्रा हरवला. पण ॲपल एअरटॅग डिव्हाईसमुळे महिलेनं अवघ्या एका तासात कुत्र्याच्या शोध घेतला. चुकून घराचा दरवाजा उघडा राहिल्याने या महिलेचा कुत्रा घराबाहेर पडला आणि हरवला. पण अशी घटनेचा धोका लक्षात घेता आधीच त्यांनी कुत्र्याच्या गळ्यातील कॉलरवर Apple AirTag डिव्हाईस लावलं होतं.


आपला कुत्रा हरवल्याचं लक्षात आल्यावर महिला फारच चिंतेत होती. पण तेव्हा या महिलेला कुत्र्याच्या गळ्यात AirTag डिव्हाईस असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या महिलेने GPS ट्रॅकरची मदत घेत कुत्र्याला शोधलं. महिलेने GPS ट्रॅकरने कुत्र्याच्या ठिकाणाचा शोध घेतला. या महिलेचा कुत्रा 20 मिनिटांच्या अंतरावर होता. 


या आधीही झालाय AirTag डिव्हाईसचा वापर


हरवलेल्या वस्तूंसाठीच हे डिव्हाईस तयार करण्यात आलं आहे. याआधीही Apple AirTag डिव्हाईसचा वापर करत हरवलेल्या वस्तू सापडल्या आहेत. अलिकडे ॲपल एअरटॅग डिव्हाईसमुळे चोरी झालेल्या कार सापडण्यात मदत झाली होती.


Apple AirTag मुळे चोरीची कार सापडली


रिपोर्टनुसार, या वर्षी जून महिन्यामध्ये ॲपल एअरटॅग डिव्हाईसमुळे कॅनडामधील एका व्यक्तीची चोरीला गेलेली रेंज रोवर कार सापडली. या कारच्या मालकाने कारमध्ये तीन Apple AirTag डिव्हाईस बसवले होते. त्यामुळे कार मालकाने GPS ट्रॅक करत चोरीला गेलेली कार कुठे आहे याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी कार शोधत योग्य ती कारवाई केली. याआधीही कार चोरीला गेली होती. त्यामुळे मालकाने या कारमध्ये एअरटॅग डिव्हाईस बसवलं होतं.


काय आहे एयरटॅग? ( What is AirTag )


Apple AirTag हे एक ट्रॅकिंग डिव्हाइस आहे. जे तुम्ही तुमची एखादी वस्तू किंवा सामानावर लावू शकता आणि त्या वस्तून AirTag च्या मदतीने जीपीएसवर ट्रॅक करु शकता. या उपकरणाचं वजन फक्त 11 ग्रॅम आहे. एक लहान डिव्हाइस तुमची वस्तू शोधण्यासाठी फार उपयोगी आहे.