Viral Video : प्रेम हे आंधळे असते, प्रेमाला सीमा नसते, अशातच आजकाल लोकं परदेशी मुलींशीही (Foreign Daughter In Law) लग्न करण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर, भारतीय मुलं परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याचे सामान्यतः दिसून येते. पण परदेशी मुली लग्नानंतर आपल्या पतीसोबत भारतात राहण्यासाठी आल्याचे क्वचितच पाहायला मिळते, सध्या सोशल मीडीयावर (Social Media) असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही 'फॉरेनची पाटलीण' म्हणजेच परदेशी सून आपल्या प्रेमासाठी (Love Story) केवळ भारतातच नाही, तर इथल्या शेतातही राबताना दिसत आहे. शेतात ती चक्क कांदा पेरणी करत असल्याचे दिसत आहे. 


 


 






 परदेशी सून शेतात पेरतेय 'देशी स्टाईल' मध्ये कांदा
 ही परदेशी सून 'देशी स्टाईल' मध्ये शेतात कांदा पेरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या परदेशी सुनेने भारतीय कपडे घातले आहेत, तसेच भांगेत सिंदूरही भरला आहे. ती शेतात आरामात बसून कांद्याची पेरणी करत आहे. तिला शेतात काम करत असल्याचे पाहून तिचा नवरा येतो आणि तिला 'तुला काही विचारू का' म्हणतो, ज्याच्या उत्तरात ती हिंदीत 'हो नक्की' असं म्हणते. मग नवरा तिला विचारतो 'तू कुठली आहेस', तर ती म्हणते 'मी जर्मनीची आहे' आणि इथे शेतात कांदे लावत आहे. मग नवऱ्याने थट्टा करत तिला सांगितले की, 'तू सातासमुद्रापार जर्मनीहून भारतात कांदा लावायला आली आहेस', तेव्हा बायकोही आनंदाने 'हो' म्हणते. ती असेही म्हणते की तिला मजा येत आहे, खूप छान वाटत आहे. यादरम्यान दूर उभ्या असलेल्या परदेशी सुनेचे उत्तर ऐकून सासूही आनंदी होऊन हसताना दिसते.


परदेशी सून शेतात कांदा पेरतानाचा व्हिडीओ एकदा पाहाच...!


हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. हा व्हिडीओ नमस्ते जुली या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 19 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 19 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 1.5 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 15 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ खूपच मजेशीर असल्याचे यूजर्स सांगत आहेत.


 


संबंधित बातमी


Teacher Love Story: महिला शिक्षिका विद्यार्थिनीच्या प्रेमात पडली! लिंग बदलले आणि लग्न केले, अनोखी प्रेमकहाणी जाणून घ्या