Video Viral : उत्तर प्रदेशातील एका सरकारी शाळेत ही धक्कादायक घटना समोर आली आहे, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. एका मुख्याध्यापकाने एका महिला शिक्षिकेला चपलेनने मारहाण केली. मुख्याध्यापकांनी महिला शिक्षिकेवर केलेल्या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल व्हिडीओमध्ये व्हायरल झाला आहे. काय घडले नेमके?


शिक्षणाच्या पवित्र ठिकाणी गैरवर्तन


मुख्याध्यापकांनी महिला शिक्षिकेवर केलेल्या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल व्हिडीओमध्ये व्हायरल झाला आहे. ही घटना खेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुंगू खेडा शाळेची आहे. या घटनेनंतर या मुख्याध्यापकाला आता बडतर्फ करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA- मूलभूत शिक्षा अधिकारी) लक्ष्मीकांत पांडे यांनी माहिती दिली आहे की, व्हायरल व्हिडिओच्या आधारे मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्यात शाळेत उशिरा आल्याने मुख्याध्यापकाने एका महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण केली. सरकारी शाळेतील या निर्दयी मुख्याध्यापकाने संतप्त होऊन शिक्षकाला बुटांनी बेदम मारहाण केली. या व्हिडीओमध्ये मुख्याध्यापक शिक्षिकेला जोरजोरात मारताना दिसत आहे.


 






 


सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण


व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक अजित वर्मा आहेत, जे शाळेत 10 मिनिटे उशिरा आल्याने महिला शिक्षकाला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेच्या वेळी शाळेमध्ये इतर लोकांसह शाळकरी मुलेही उपस्थित होती, जी व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिक्षणाच्या पवित्र ठिकाणी शिक्षण देणारेच असे गैरवर्तन करतात, तर त्यांच्याकडून शिक्षण घेणारी येणारी पिढी काय शिकणार? हा प्रश्न निर्माण होतोय.


संबंधित इतर बातम्या