Kaitlyn Stewart : लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होते. काहींनी Dalgona कॉफी करतानाचे व्हिडीओ शेअर केले तर काहींनी पिझ्झा किंवा केक बनवतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. पण लॉकडाऊनमध्ये मद्यप्रेमींना घरच्या घरी कॉकटेल तयार करण्याच्या टिप्स सांगून बारटेंडर असणारी कॅटलिन स्टीवर्ट (Kaitlyn Stewart) ही टिक टॉक स्टार झाली. 36 वर्षाची कॅटलिन स्टीवर्ट हिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'ज्या लोकांना मी मार्गरीटा हे कॉकटेल कसं तयार करते हे जाणून घ्याचं होतं त्यांच्यासाठी मी शूट करुन काही व्हिडीओ शेअर करत होते.' कॅटलिन स्टीवर्टचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानं ती टॉक स्टार झाली.


एका व्हिडीओमुळे बदललं आयुष्य
एका ट्वीस्टेड स्पूनमधून सोडा ओतण्याची पद्धत शिकवणारा कॅटलिन स्टीवर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे कॅटलिन स्टीवर्टला लोकप्रियता मिळाली. तिचे डान्स करतानाचे आणि गाण्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ती टिक-टॉक स्टार झाली. 


जगातील सर्वात मोठी कॉकटेल स्पर्धा जिंकली
कॅटलिन स्टीवर्टनं टोरंटोमधील फिल्म स्कूलमध्ये शिकत असताना बारट्रेडिंग सुरू केले आणि 2017 मध्ये तिनं 'डायजिओ वर्ल्ड क्लास' ही जगातील सर्वात मोठी कॉकटेल स्पर्धा जिंकली. 'TikTok हे एक विचित्र आहे, मला ते अजूनही समजले नाही, परंतु या व्हिडीओमुळे लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते.', असं कॅटलिन स्टीवर्टनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 2022 मध्ये कॅटलिन स्टीवर्टच्या टिक-टॉक फॉलोवर्सची संख्या 1.8 बिलियन एवढी झाली. तिच्या फॉलोवर्सची संख्या अजून वाढत आहे. टिक-टॉक या व्हिडीओमध्ये कॅटलिन स्टीवर्ट ही वाइन, व्हिस्की आणि क्राफ्ट कॉकटेल या प्रकारच्या ड्रिंग्सबाबत माहिती देते. 'टिक-टॉक व्हिडीओमधून ड्रिंक इंडस्ट्रीबाबत लोकांना माहिती दिली जाऊ शकते.'


कॅटलिनचे फॉलोवर्स 
कॅटलिन स्टीवर्टच्या एकुण फॉलोवर्सपैकी  43.7 टक्के  युझर्स हे 18 ते 24 वयोगटातील आहेत. तर 31.9 टक्के युझर्स हे 25 ते 34 वयोगटातील आहेत. कॅटलिन स्टीवर्टच्या कॉकटेल व्हिडीओच्या अकाऊंटला 331,000 लोक फॉलो करतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या