Viral Love Story: प्रेमासाठी काय पण, हे वाक्य तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल, वाचलं असेल. मात्र काही लोक हे वाक्य खऱ्या अर्थाने जगतात. असं म्हणतात प्रेमात वय, पैसा आणि प्रतिष्ठा महत्वाची नसते, तर प्रेमासाठी फक्त आणि फक्त आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती महत्वाची असते. याचाच आता प्रत्येय आलाय तो पाकिस्तानमधील लाहोरमध्ये. येथे मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या एका 19 वर्षाच्या मुलीची 70 वर्षाच्या व्यक्तीशी टक्कर झाली. दोघांमध्ये काही बोलणं झालं, नंतर त्याची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांची लव्ह स्टोरी आता व्हायरल होत आहे. 


लियाकत आणि शमाइला हे दोघेही लाहोरमध्ये राहतात. लियाकत अली आपल्या लव्ह स्टोरीबद्दल अगदी खुलेपणाने बोलतात. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल लियाकत म्हणाले, 'एकदा ती (शमाइला) जात असताना मी मागून एक गाणे गुणगुणायला सुरुवात केली. तिने माझ्याकडे वळून पाहिले. मग काय, आम्ही प्रेमात पडलो. याचबद्दल जेव्हा शमाइलाला विचारलं गेलं की, लियाकत हे तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत? यावर ती लगेच म्हणाली, 'बघा... प्रेमात वय पाहिलं जात नाही, प्रेम बस होऊन जातं. वय काय, जात काय, प्रेमात फक्त प्रेम पाहिलं जात. वयातील अंतरामुळे चर्चेत आलेल्या या पाकिस्तानी जोडप्याच्या लव्ह स्टोरीवर सोशल मीडिया यूजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.


लियाकत अली यांनीही या याबद्दल बोलताना म्हटलं आहे की, माणसाचं हृदय तरुण असलं पाहिजे, यात वयाचं काय आहे? शमायला सांगते की, सुरुवातीला कुटुंबीयांनी या नात्यावर आक्षेप घेतला होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. नंतर नातेवाईक म्हणाले की, तुमची हीच इच्छा असेल, तर आम्ही काय करू शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी लग्न केल्याचे या जोडप्याने सांगितले आहे. वयात अंतर असलेल्या जोडप्याने लग्न करावे का? असं लियाकत याना विचारलं असता ते म्हणाले आहेत की, केलं पाहिजे. याच बद्दल बोलताना शमाइला म्हणाली की, प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. लियाकत म्हणाले की, रोमँटिक होण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रत्येक वयाची एक वेगळी मजा असते. लियाकत म्हणाले की, त्याने आयुष्यभर आनंद लुटला आहे. शमायला म्हणते की, ती लियाकतसोबत खूप खूश आहे. दरम्यान, याची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी यांची लव्ह स्टोरी गूगलवर साराच करू वाचत आहे.