Bus Conductor Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही ना काही व्हायरल होत असते, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बस कंडक्टरने सर्वांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 


बस कंडक्टरचं होतंय कौतुक


या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, बसमध्ये प्रवेश करताच काही लोक स्वतःसाठी जागा मिळवत होते, परंतु बस कंडक्टर सुरेंद्र शर्मा तिकीट कापण्याऐवजी कुठल्या तरी वेगळ्याच कामात व्यस्त होते. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले की, कंडक्टर तिकीट कापण्याऐवजी काय करतोय? हा सर्व प्रकार पाहून तेथील एका प्रवाशाने त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी कंडक्टर सुरेंद्रच्या या कामाचे खूप कौतुक केले आणि आपल्या प्रतिक्रियाही दिल्या.


 






 


ज्या बसमध्ये ड्युटी करतात, त्या बसमधील लोकांना पाणी पाजतात


हरियाणाचे राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी ट्विटरवर सुरेंद्र शर्मा यांचा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, हरियाणा रोडवेजमध्ये कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या सुरेंद्रजींची खासियत म्हणजे, ते ज्या बसमध्ये ड्युटी करतात, त्या बसमध्ये पाण्याचे अनेक कॅन असतात. पाणी. बसमध्ये चढताच प्रवाशांना पाणी देऊन ते लोकांच्या मनावर छाप सोडतात. बस कंडक्टर सुरेंद्र शर्मा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे.


नेटकऱ्यांकडून कौतुकचा वर्षाव


यावर नेटकऱ्यांनी लिहिले की सुरेंद्रभाईंना मनापासून सलाम! काहींनी लिहिले - देवासारख्या माणसाला आनंदी ठेव आणि असेच चांगले काम करत राहा. हा व्हिडिओ सोशल मीडीयावर दिसताच काही क्षणातच या व्हिडीओला लाखोंच्या संख्येने यूजर्सची पसंती मिळाली आहे. आणि हा व्हिडीओ ते शेअरही करत आहेत. तसेच, या व्हिडीओवर लोकांच्या कौतुकास्पद कमेंट्सही येत आहेत. 


महत्वाच्या बातम्या :