Viral Video : सोशल मीडियावर मांजरीचे व्हायरल व्हिडीओ आपण अनेकदा पाहतो. कधी मांजरी एकमेकींशी खेळताना दिसतात, तर कधी भांडताना दिसतात. मांजरीचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना पाहायला खूप आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक क्यूट पांढऱ्या रंगाची मांजर दिसतेय. या मांजरीबरोबर जे झाले ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडीओत ही मांजर फारच गोंधळलेली दिसतेय. असं नेमकं काय झालं? ते तुम्हीच पाहा. 






गोंधळलेली मांजर : 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओबद्दल बोलायचे झाल्यास, एक मांजर बबल टबच्या मध्यभागी उभी आहे. मांजरीला तिच्याबरोबर नेमकं काय होतंय हे कळत नाही. त्यानंतर अचानक टब बबल होऊ लागतो. आणि मांजर बबलमध्ये अडकते. या व्हिडिओमध्ये मांजर खूपच गोंडस दिसत आहे. गोंडस मांजरीवर सोशल मीडिया यूजर्सचे भरभरून प्रेम करताना दिसतायत. 


हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर दिसताचा काही क्षणातच या व्हिडीओला लाखोंच्या संख्येने यूजर्सची पसंती मिळाली आहे. आणि हा व्हिडीओ ते शेअरही करत आहेत. तसेच, या व्हिडीओवर लोकांच्या मजेदार कमेंट्सही येत आहेत. तुम्हीसुद्धा मांजरीचा हा मजेशीर व्हिडीओ पाहा. 


महत्वाच्या बातम्या :