Trending News : रंगांचा सण म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजेच होळीचा सण. होळी (Holi 2022) हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातील सर्वच राज्यांत होळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 17 मार्चला होलिका दहन तर 18 मार्चला धुळवडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एका गावात होळीची एक विचित्र परंपरा आहे जी 90 वर्षांहून अधिक काळापासून चालत आलेली आहे. 


महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यातील एका गावात, "नवीन जावयाला" गाढवाची स्वारी आणि त्याच्या आवडीचे कपडे मिळतात. जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात ही अनोखा परंपरा अजूनही जपली जातेय. आधी गावातील नवीन जावयाची ओळख पटवली जाते आणि मग होळीच्या दिवशी तो बेपत्ता होऊ नये आणि गाढवावरची सफर सोडू नये यासाठी त्याच्यावर नजरदेखील ठेवली जाते.


पाहा हा व्हिडीओ :


 



 


 



मिळालेल्या माहितीनुसार, ही परंपरा आनंदराव देशमुख नावाच्या रहिवाशाने सुरू केली होती. ज्यांना गावकऱ्यांचा खूप आदर होता. आनंदरावांच्या जावयापासून ही परंपरा सुरु झाली आणि त्यानंतर वर्षांनंतरही ती सुरूच आहे. ही गाढवाची राईड गावाच्या मध्यापासून सुरू होऊन 11 वाजता हनुमान मंदिरात संपते, असे सांगितले जाते. यानिमित्ताने गावातील निवडक सुनेला त्यांच्या आवडीचे कपडे दिले जातात.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha