Trending News : भारतात, एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांकडे फार पूर्वीपासून अपमानास्पद भावनेने पाहिले जाते. सध्या एचआयव्हीबाबत समाजात पसरलेल्या सनातनी विचारसरणीवर आधुनिक काळाचा परिणाम होत आहे. भारतातील कोलकाता येथे एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी कॅफे चालवले जात आहे. हे आशियातील पहिले कॅफे आहे जे एचआयव्ही पॉझिटिव्ह स्टाफद्वारे चालवले जात आहे.


देशभरात एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांना काम देण्यास सर्वसामान्य लोक घाबरतात. अशा परिस्थितीत एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांना समाजात उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसते, असे अनेकदा दिसून आले आहे. सध्या कोलकातामध्ये 'कॅफे पॉझिटिव्ह' (Cafe Positive)  चालवले जात आहे. जे या लोकांच्या जीवनात काही बदल घडवून आणण्यासाठी एक उदाहरण देत आहे. 


कॅफे पॉझिटिव्ह सात एचआयव्ही पॉझिटिव्ह तरुण चालवत आहेत. ज्यांनी 'कॉफी बियॉन्ड बाऊंडरीज' ही टॅगलाइन ठेवली आहे. असे सांगितले जात आहे की, 'आनंदघर' या एनजीओचे संस्थापक कल्लोल घोष हे या कॅफेचे मालक आहेत. एनजीओ 'आनंदघर' ही मानसिक आरोग्य समस्या किंवा एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी काम करते.


कॅफेचा मुख्य उद्देश नेमका काय ?


एका मुलाखतीत कल्लोल घोष यांनी सांगितले की, फ्रँकफर्टला गेल्यानंतर हा कॅफे उघडण्याची कल्पना त्यांना सुचली. कारण तिथे एक कॅफे होता जो संपूर्णपणे एचआयव्ही पॉझिटिव्ह स्टाफद्वारे चालवला जात होता. ते म्हणतात की हे कॅफे उघडणे सोपे काम नव्हते, कारण बहुतेक घरमालक आपला परिसर एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक वापरतील म्हणून देण्यास मनाई करत होते.  


कल्लोल घोष म्हणतात की, हे आशियातील पहिले कॅफे आहे जे एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक चालवत आहेत. त्यांच्या मते, या एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांना स्वावलंबी बनवणे हा या कॅफेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून ते आपली उपजीविका करू शकतील. पॉझिटिव्ह कॅफेमध्‍ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आनंद आहे की ते त्यांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करू शकत आहेत. त्याच वेळी, तो म्हणतो की जेव्हा समाज एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांना स्वीकारत नाही, अशा परिस्थितीत कॅफे त्यांना संधी आणि आशा प्रदान करत आहे.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha