चेन्नई: कामावर निष्ठा असेल आणि कामाप्रती प्रामाणिकपणा असेल तर त्याचे फळ हे मिळतेच. अनेक कंपन्या त्यांच्या अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सन्मान करतात, त्यांना वेगवेगळे गिफ्ट्स देतात. असाच प्रकार हा चेन्नईत घडला आहे. कोरोना काळात कंपनी अडचणीत असतानाही चांगल्या प्रकारे काम करुन कंपनीचा उभारी देण्याचं काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना एका आयटी कंपनीच्या सीईओने बीएमडब्लू कार भेट दिल्या आहेत. 


सॉफ्टवेअर सेवा निर्यात करणारी कंपनी असलेल्या किस्सफ्लो इंकने प्रत्येकी एक कोटी रुपये किंमत असलेल्या पाच बीएमडब्लू कार या पाच कर्मचाऱ्यांना भेट दिल्या आहेत. कंपनीप्रति असेलली निष्ठा आणि प्रामाणिक काम यामुळे कंपनीने या कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे. 


 




या कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याचा कार्यक्रम अत्यंत गुप्त राखण्यात आला होता. ज्या कर्मचाऱ्यांना या कार भेट देण्यात येणार होत्या त्या कर्मचाऱ्यांना काहीच वेळ आधी ही माहिती देण्यात आल्याने ते कर्मचारीही सरप्राईज झाले होते. 


किस्सफ्लो इंक या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सुरेश संबंदम यांनी सांगितलं की, ज्या पाच कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे ते कर्मचारी हे कंपनीच्या प्रवासामध्ये सुरुवातीपासून सोबत आहेत, आजही उत्तम सेवा करत आहेत. हे कर्मचारी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आले असून त्यांनी अनेक जीवनात आव्हांनांचा सामना केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: