Anand Mahindra Viral Post: बिझनेस आयकॉन आनंद महिंद्रा ट्विटरवर दररोज नवीन पोस्ट टाकत सक्रिय राहतात. यावेळी त्यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये एक वृद्ध जोडपं तिरंगा फडकवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी सलाम केला आहे. 


आनंद महिंद्रांची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल!
या फोटोमध्ये वृद्ध पती तिरंगा व्यवस्थित लावण्यासाठी ड्रमवर उभ्या असलेल्या आपल्या पत्नीला पाठिंबा देताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी दावा केला की, या दोघांकडून शिकण्यासारखे आहे. हे देशप्रेम अद्भूत आहे. याची तुलना कशातच होऊ शकत नाही. 


 






या जिद्दीला सलाम


‘हर घर तिरंगा’अभियान अंतर्गत तिरंगा फडकवण्याची वृद्ध दाम्पत्याची ही जिद्द महान देशभक्तीचे उदाहरण आहे. पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यापासून त्याला 38,000 हून अधिक लाईक्स आणि 3200 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. वृद्ध जोडप्याच्या तिरंगा फडकवण्याच्या या जिद्दीला यूजर्सनी सलाम केला आहे.


घरोघरी तिरंगा मोहीम


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना "हर घर तिरंगा" मोहिमेला पाठिंबा देण्यास सांगितले होते, त्यानंतर लोक घरोघरी तिरंगा फडकवत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशवासीयांचा उत्साह पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्टला संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात मग्न झालेला पाहायला मिळाला. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


महत्वाच्या बातम्या :