Viral Video Of Accident : वाहन कोणतंही असो, पण रस्त्यावर जपून चालवणं गरजेचं आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. आजकाल स्कूटीसोबत झालेल्या अपघाताशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ही घटना जरा वेगळ्या प्रकारची आहे. याचं कारण म्हणजे जर तुम्हीही लहान मुलांना स्कूटीवर पुढे बसवत असाल, तर हा व्हिडीओ (Viral Video) नक्की पाहा, वाहनचालकाची एक चूक त्याला चांगलीच महागात पडली असल्याचे या व्हिडीओतून समोर येत आहे. (Social Media)


 


 






 


लहान मुलांना स्कूटीवर घेऊन प्रवास करणार असाल, तर हा व्हिडीओ एकदा पाहाच
आजच्या काळात लोक बाइकपेक्षा स्कूटीला प्राधान्य देतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर बाइक्सच्या तुलनेत ती हलकी आहे आणि चालवायलाही सोपी आहे. साधारणपणे, बाईकमध्ये वारंवार गीअर्स बदलण्याचा त्रास होतो, परंतु स्कूटीमध्ये असा कोणताही त्रास नाही. स्कूटीमध्ये फक्त एक्सलेटर आणि ब्रेक्स असतात. पण जेव्हा तुम्ही याच स्कूटीवरून लहान मुलांना घेऊन जाता, तेव्हा सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते, याच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती स्कूटी चालवत आहे आणि त्याच्यासोबत एका मुलालाही घेऊन जात आहे. तो त्याच्या घरासमोर उभा राहून कदाचित कोणीतरी येण्याची वाट पाहत आहे. इतक्यात त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल येतो आणि तो बोलू लागतो. यादरम्यान, घरातून एक महिला बाहेर येताच स्कूटीवरून आलेल्या मुलाने एक्सलेटरला धक्का दिला. मग काय, स्कूटी पुढे सरकते आणि त्यावर बसलेल्या व्यक्तीला तोल जातो. अशा स्थितीत तो स्कूटीवरून जोरात मागे पडतो, त्याचवेळी स्कूटीही जोरात भिंतीला आदळते आणि तिथेच पडते. ही घटना घडताच अनेकजण घरातून बाहेर पडतात आणि त्यांना मदत करू लागतात. या अपघातात व्यक्तीला खूप दुखापत झाल्याचे दिसत आहे, परंतु सुदैवाने मुलाला काहीही झाले नाही.


सोशल मीडियावर व्हायरल 
या भीषण अपघाताचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @RoadsOfMumbai या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 48 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.