Trending Video : सोशल मीडियावर लोक वेगवेगळे स्टंट करतानाचे व्हिडीओ शेअर करतात. अशा व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन होतं. आजकाल प्राण्याच्या शिकारीचे धक्कादायक आणि मनोरंजक व्हिडीओ अधिक जास्त व्हायरल होताना पाहायला मिळतात. जंगली प्राण्यांचे शिकारीचे व्हिडीओ युजर्सच्याही अधिक पसंतीस उतरतात. एका तरुणीचा सापासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चकीत झाले आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा. सापाला सर्वात विषारी प्राणी मानले जाते. यामुळे साधारणपणे सर्वजण सापापासून दूर पळतात.
कोणताही मनुष्य सापासमोर येण्यास घाबरतो. पण, काही जण मात्र असे धोकादायक प्राणी पाळताना पाहायला मिळतात. या व्हिडीओत एक तरुणी सापासोबत खेळताना दिसत आहे. अशा लोकांना धोकादायक स्टंट करणं अधिक पसंत असतं. असं करण महागात पडू शकतं याचा अंदाज व्हिडीओ पाहून येईल.
साप पाळण्याचा प्रयत्न अनेकाना महागात पडल्याचं दिसून येतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुळी पाळीव सापा बरोबर दिसत आहे. हा पाळीव साप पायथन प्रजातीचा आहे. व्हिडीओमध्ये तरुणी सापाला हातामध्ये खेळवताना दिसत आहे. मात्र, साप अचानक चिडून तिच्या हल्ला करायला सुरुवात करतो. हा व्हिडीओ एका इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, साप तरुणीच्या हाताला अनेक वेळा चावतो. साप तरुणीच्या हातावर एकामागून एक वार करतो. पायथन हा साप विषारी प्रजातीचा नसल्याने तरुणीला कोणतंही नुकसान होतं नाही. मात्र असे छंद जिव्हारी बेतू शकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या