Devasahayam Pillai : 18 व्या शतकात तत्कालीन त्रावणकोर राज्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या देवसहायम यांना आज व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांनी संत म्हणून घोषित केले आहे. देवसहायम यांना लाजर म्हणूनही ओळखले जाते. व्हॅटिकनच्या कठीण परीक्षेत हसत हसत संताची पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. नीलकंदन पिल्लई असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म सध्याच्या कन्याकुमारी येथे एका हिंदू कुटुंबात झाला होता.
नीलकंदन पिल्लई यांनी 1745 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांना लाजरस हे नाव देण्यात आले. त्यांना देवसहायम म्हणून देखील ओळखले जात असे. पिल्लई यांनी आपल्या हायातीत जातीभेदाविरुद्ध लढा उभारला होता. त्यामुळे त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला आणि शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. परंतु, 2012 मध्ये व्हॅटिकनने त्यांच्या हौतात्म्याला मान्यता दिली. 2013 मध्ये एका महिलेने पिल्लई यांच्या नावाची प्रार्थना केल्यानंतर तिच्या गर्भावस्थेत मृत पावलेल्या मुलाने हालचाल केल्याचे या महिनेले सांगितले. त्यानंतर दावसहयाम यांची संत या पदासाठी निवड करण्यात आली आणि आज त्यांना संत म्हणून घोषीत करण्यात आले.
संबंधित महिलेने सांगितले की, तिचा गर्भ डॉक्टरांनी "वैद्यकीयदृष्ट्या मृत" घोषित केला होता. त्यामुळे तिच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नव्हती. यावेळी तिने पिल्लई यांची प्रार्थना केली. त्यामुळे तिच्या गर्भाशयात थोडीशी हालचाल झाल्याचे जाणवले. व्हॅटिकनने या महिलेने सांगितलेल्या चमत्काराचा स्वीकार केला आणि देवसहया यांना संताचा दर्जा दिला.
फादर जॉन कुलंदाई यांनी या विषयावर काम करणाऱ्या कन्याकुमारी येथील टीमचे प्रमुख सदस्य म्हणून व्हॅटिकन येथील प्रकाशनात भाग घेतला होता. याबाबत फादर जॉन कुलंदाई म्हणाले, 'हे संतत्व आम्हाला भेदभावमुक्त जीवन जगण्याचे निमंत्रण आहे.
जात आणि जातीयवादाविरुद्ध लढा
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी देवसहयम यांनी व्हॅटिकनला पत्र लिहून देवसहयम यांच्या जातीचे नाव हटवण्याची मागणी केली आहे. 'संत देवसहयम यांनी समानतेसाठी काम केले असून जातीवाद आणि जातीयवादाच्या विरोधात त्यांनी लढा दिला.