Viral Video : सोशल मीडियाच्या जगात रोज काही ना काही घडतच असते. कधी कधी असे काही व्हिडिओ असतात जे खूप हृदयाला भिडणारे असतात, तर कधी काही व्हिडिओ भीतीदायक तसेच दहशत पसरवण्यासारखे असतात. असाच एक व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि हृदयाचा थरकाप निर्माण केला आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलं जळत्या लाकडावर कशी धावत आहेत हे दाखवण्यात आलं आहे.
जळत्या लाकडावरून धावली लहान मुलं
व्हायरल झालेला हा व्हिडिओ बलिया येथील बलथरोडचा आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुले चक्क आगीवर कशी धावत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यात उभा असलेला एक माणूस लहान मुलांना आगीवर चालण्यासाठी ढकलत आहे. या व्हिडिओमध्ये चहूबाजूंनी एक वर्तुळ बनवलेले दिसत आहे. ज्यामध्ये मुले वर्तुळाबाहेर धावत असतात. चक्क जळत्या लाकडांना पार करत ही लहान मुले धावत आहेत. या शर्यतीत प्रथम युवक सहभागी होत असून नंतर लहान मुले धावत आहेत.
व्हिडिओ चांगलाच व्हायरल
या व्हिडिओमध्ये जे दृश्य दिसत आहे. ते अतिशय भीतीदायक आहेत. कदाचित त्यामुळेच हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ india.com ने शेअर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Viral Video : एक फूल दो माली... सिंहीणीसाठी भिडले दोन सिंह, कोणी मारली बाजी? पाहा व्हिडीओ
- Viral Video : 5 महिन्यांच्या चिमुकल्याचं आईसोबत वर्कआऊट, पाहा व्हिडीओ
- Viral News : पॅनल रूममध्ये फणा पसरून बसला कोब्रा, रेल्वे मास्तरला पळता भुई थोडी