Trending Video : सध्या सोशल मीडियावर एका उंदराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यामध्ये अनेक कुत्र्यांनी एका उंदराला घेरलं आहे. ही घटना न्यूयॉर्कमधील टॉम्पकिन्स स्क्वेअर डॉग रनमध्ये घडली. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हे गार्डन कुत्र्यांना फिरण्यासाठी बनवण्यात आलं आहे. येथे लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना फेरफटका मारण्यासाठी आणि खेळण्यासाठी आणतात.


या व्हिडीओमध्ये सर्व कुत्रे उंदराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. उंदीर मात्र कुत्र्यांच्या मधून मिळेल त्या बाजूनं पळण्याचा प्रयत्न करत आहे. कुत्र्याचे मालक कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण सर्व कुत्रे उद्यानात आलेल्या उंदराच्या मागे लागून पाठलाग करत आहेत. 


हा व्हिडीओ आतापर्यंत सहा दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. कुत्र्याचे मालक कुत्र्यांना बांधलेल्या साखळीने घट्ट ओढताना दिसतात. सर्व कुत्र्यांमध्ये एक उंदीर धावताना दिसत आहे. उंदरामुळे कुत्रे खूप चिडलेले दिसत आहेत. कुत्रे उंदराचा पाठलाग करताना दिसत आहे. 






कुत्रा उंदराला तोंडात पकडतो अन्


व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्रे पळून उंदराचा पाठलाग करताना दिसत आहेत. एक वेळ अशी येते की, या कुत्र्यांपैकी एक कुत्रा उंदराला त्याच्या जबड्यात पकडतो. पण कुत्रा उंदराला लगेच सोडून देतो. 


कुत्र्याचे मालक कुत्र्यांना पकडतात


एकीकडे कुत्रे उदराला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे मालक त्यांना गळ्यात बांधलेल्या पट्ट्याच्या आधारे पकडून ठेवतात. कुत्र्याच्या मालकाच्या एका मित्राने देखील ट्विटरवर एक अपडेट पोस्ट करत म्हटले आहे की, 'मी माझा मित्र जोनाह (आता हूडी मॅन म्हणून ओळखला जातो) आणि त्याचा कुत्रा, झोए यांच्या वतीने पोस्ट करत आहे. ते दोघे या घटनेच्या वेळी तेथे होते. या व्हिडिओमध्ये ते दोघेही दिसत आहे. दोघांना कोणतीही जखमी झाली नसून दोघेही ठीक आहेत.


इतर बातम्या