Raksha Bandhan 2023 : बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे,  रक्षाबंधन. बहीण भावाला ओवाळून राखी बांधते आणि भावाच्या भरभराटीची प्रार्थना करते. तर, भाऊ बहिणीची रक्षा करण्याचं वचन देतो. या सणाची सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे, भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून भेटही देतो.


आजकाल डिजिटल युग आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पैसे देताना डिजिटल पद्धतीने देण्यात येत आहे. काही भाऊ आपल्या बहिणीला ऑनलाईन गिफ्ट मागवतात किंवा मग मोबाईल स्कॅनरच्या मदतीने तिला पैसे देतात. मात्र एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बहिणीनं आपल्या भावाकडून गिफ्ट घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 


क्यूआर कोडसह मेहंदीचा व्हिडीओ


व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका बहिणीनं चक्क आपल्या हातावर QR Code काढला आहे. आपल्याला माहिती आहे, की यूपीआय पेमेंट करण्यासाठी आपल्याला एक QR कोड स्कॅन करावा लागतो. या व्हिडीओमध्ये बहीण आपल्या भावाला म्हणत आहे की, जर हा  QR कोड स्कॅन झाला तर तू मला 5000 रूपये द्यायचे. 


व्हिडीओ होतोय व्हायरल


सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सुमारे 21 हजार एक्स (ट्विटर) यूजर्सनी याला लाईक केलं आहे.






काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया?


एका यूजरने लिहिले आहे, हे फारच मजेशीर आहे. टेक्नाॅलाॅजी आणि ट्रेडीशन एकत्र. तर दुसऱ्याने लिहिले आहे, भविष्यात वधू-वरांना शगुन देण्याऐवजी त्यांच्या कपड्यांवर किंवा मेंदीवर असे QR कोड केले तर काय होईल! फेक असो वा खरं, ही आयडिया खरंच भारी आहे, असं एका यूजरने म्हटलं आहे. तर, 'डिजिटल इंडिया' मोहिमेमुळे काय काय पहावं लागणार आहे, असंही एकाने म्हटलं आहे.


भावाला राखी बांधावी तरी कधी?


यावेळी 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यासोबतच रक्षाबंधनाला पौर्णिमेचा योगायोग देखील आहे, जो खूप खास मानला जातो. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.59 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होते आणि 31 ऑगस्ट सकाळी 7:05 वाजता पौर्णिमा संपते, त्यामुळे या दरम्यानचा वेळ हा राखी बांधण्यासाठी योग्य आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Rakshabandhan 2023 : यंदाच्या रक्षाबंधनाला 'या' 5 मिठाईने सणाचा आनंद द्विगुणित करा; आरोग्य जपा