एका लग्नाची गोष्ट... गायीची मेहंदी अन् हळद, थाटामाटात निघाली बैलाची वरात; 'या' अनोख्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा
Rajasthan News : मेहंदी आणि हळद लावून गायीला वधूप्रमाणे सजवण्यात आले. गाजत-वाजत वरात काढण्यात आली. गाय आणि बैलाचं हिंदू रितीरिवाजांनुसार विधीवत लग्न पार पडलं.
Cow-Bull Marriage Rituals : राजस्थान (Rajasthan) तेथील राजवाडे आणि राजेशाही थाट यासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा सेलिब्रिटींचे लग्न सोहळा चर्चेत येतात. गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी राजस्थानला पसंती दिली आहे. इतरही अनेक लोक विवाह स्थळासाठी राजस्थानला पसंती देतात. सध्या राजस्थानमधील एक आगळ-वेगळा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारणंही तसंच आहे. राजस्थानमध्ये गाय आणि बैलाचा अनोखा विवाह पार पडला आहे. नववधू आणि नवरदेवाप्रमाणे सजवून संपूर्ण विधीनुसार हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. यामागचं कारण काय जाणून घ्या...
गाय-बैलाचा अनोखा विवाह
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील फतेहपूर शेखावटी येथे हा अनोखा विवाह पार पडला. बैल आणि गायीचे लग्न थाटामाटात आणि मेहंदी, हळदी लावून विधीवत लग्न पार पडलं. नवरदेव बैलाची बँड-बाजासह वाजत-गाजत वरात काढण्यात आली आणि वऱ्हाडी मंडळींनी नाचण्याचा आनंद लुटला. भटजींच्या मंत्रोच्चारात बैल आणि गायीचा लग्नसोहळा पार पडला. यासाठी फतेहपूरचे पंडित अमित पुजारी आणि इतर पाच पंडितांना गोवत्स यज्ञ करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. होम-हवन करण्यात आलं.
'या' अनोख्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा
मंडवार रोड येथील फतेहपूर पिंजरापोल गोशाळा सोसायटीच्या 1156 गोठ्यातील दोन गायी आणि दोन बैलांचा विवाह सोहळा पार पडला. गाय-बैलांचा थाटामाटात अनोखा लग्नसोहळा पार पडला करण्यात आला आहे. थारपारकर जातीच्या बैलांचं फतेहपूर गोशाळेतील गायींसोबत लग्न पार पडलं. एखाद्या सामान्य लग्नाप्रमाणेच सर्व विधी पार पडले.
नववधू गाय, नवरदेव बैल
बैल आणि गायीच्या लग्नासाठी मंडपही तयार करण्यात आला होता. बैलाला वरासारखं सजवलं होतं. तर वधू गायीला मेहंदी आणि हळद लावून सजवण्यात आलं होतं. बँडच्या गाजावाजासह नवरदेव बैलाची रस्त्यावरून वरात काढण्यात आली. त्यानंतर मंडपात वैदिक मंत्रोच्चारात बैल आणि गाय यांच्या विवाहाचे सर्व विधी पार पडल्यानंतर हा आगळा वेगळा विवाह संपन्न झाला.
काय आहे यामागचं कारण?
या विवाहामुळे गोशाळेतील गायींच्या जाती सुधारतील, असं तेथील लोकांचं म्हणणं आहे. भटजींनी सांगितलं की, गाय आणि बैलाचं लग्न लावल्याने पितरांना शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच वंश वाढ देखील होते, असंही मानलं जातं. गाय आणि बैलाचं लग्न संपन्ना झाल्यावर गाय आणि बैल दोघांही गोठ्यात सोडण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :