Ranu Mandal Viral Video : बॉलीवूडच्या महान गायिका लता मंगेशकर यांचे 'एक प्यार का नगमा है' हे सुपरहिट गाणे गाऊन रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली रानू मंडल सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीझोतात येताना दिसते. आजकाल ती सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड होत असलेली गाणी गाताना दिसते. आता रानूचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती बांगलादेशी सुपरस्टार हिरो आलोमसोबत दिसत आहे.


बांगलादेशी आलोमला मोठ्या संख्येने यूजर फॉलो करतात
सोशल मीडियावर बांगलादेशी सुपरस्टार हिरो आलोमला मोठ्या संख्येने यूजर फॉलो करतात. अलीकडेच, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो इंटरनेट सेन्सेशन रानू मंडलसोबत बंगाली गाणी गाताना दिसत आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक हा व्हिडिओ बांग्लादेशी सुपरस्टार हिरो आलोमच्या रेकॉर्डिंग सेशनचा आहे, ज्यामध्ये दोघे बंगाली गाणे 'तुमी चारा अमी' रेकॉर्ड करताना दिसत आहेत.


 



रानू मंडलला सहकार्याची घोषणा
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशातील लोकप्रिय व्यक्ती असलेल्या हिरो आलोमने आपल्या फेसबुक हँडलवरून रानू मंडलला सहकार्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता तिचा हा व्हिडिओ समोर आला आहे, व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये राणू काही प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. वृत्त लिहेपर्यंत सुमारे चार लाख व्ह्यूज मिळाले आहेत.


'एक प्यार का नगमा है'  गाण्यानंतर राणू रातोरात इंटरनेट सेन्सेशन
रानू मंडल सुमारे दोन वर्षांपूर्वी राणाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे सुपरहिट गाणे 'एक प्यार का नगमा है' गाताना दिसली होती. या गाण्यानंतर राणू रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली आणि तिची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर राणूही अनेक शोमध्ये दिसली, प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने तिला गाणे रेकॉर्ड करायलाही लावले. त्यानंतर हळूहळू रानूच्या वागण्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली आणि ती सोशल मीडीयावर रोज ट्रोल होऊ लागली.