Maharashtra Board 11th Admission Process : शिक्षण विभागाने यंदाच्या अकरावी प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या संभाव्य वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरायचा आहे. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा चा भाग-2 भरायचा आहे. मात्र यावर्षी दर वेळी होणाऱ्या ती नियमित फेऱ्या आणि एक विशेष फेरीनंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी बंद करण्यात आले असून त्याऐवजी प्रतिक्षा यादीनुसार (वेटिंग लिस्ट) विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत.
या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल
मुंबई ,पुणे ,पिंपरी-चिंचवड नाशिक, अमरावती ,औरंगाबाद,नागपूर या महापालिका क्षेत्रात अकरावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून 1 मे ते 14 मे दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. तर 17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-2 भरून त्यानंतर दरवर्षी प्रमाणे तीन नियमित फेऱ्या होतील. त्यानंतर एक विशेष फेरी होईल. या चारही फेऱ्यांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षापासून 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' ही फेरी रद्द करण्यात आली आहे.
असे आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक
> 1 मे ते 14 मे - विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्ज भाग- एक भरण्याचा सराव संकेतस्थळावर करणे
> 17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत - अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेश अहर्ताचा भाग एक भरून व्हेरीफाय करणे
> दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवस - अकरावी प्रवेशाचा भाग-2 भरणे, महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरणे
> नियमित फेरी 1 - 10 ते 15 दिवस
> नियमित फेरी 2 - 7 ते 9 दिवस
> नियमित फेरी 3 - 7 ते 9 दिवस
> विशेष फेरी - 7 ते 8 दिवस
> उर्वरित विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना करणे - 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' ऐवजी प्रतिक्षा यादीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI