Petrol Pump Tips: गाड्या वापरणाऱ्या लोकांना अनेकदा गाडीत पेट्रोल (Petrol) किंवा डिझेल (Diesel) भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जावं लागतं. पण तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही पेट्रोल पंपावर काही सुविधा मोफत (Free Facilities) मिळवू शकता? तुम्ही पंपावरून इंधन घेतलं किंवा नाही घेतलं, तरीही तुम्ही या सुविधा मोफत मिळवू शकतात. कोणत्याही पेट्रोल पंपाला परवाना (License) मिळण्यापूर्वी त्यांना त्यांच्या जागी या 6 मोफत सुविधांची व्यवस्था करावी लागते. जर तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून या सुविधा मिळत नसतील तर तुम्ही पेट्रोल पंपाविरोधात तक्रारही (Complaint) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या मोफत सुविधांबद्दल... 


मोफत हवा (Free Air)


तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर टायरमध्ये मोफत हवा भरू शकता. यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. या कामांसाठी कर्मचारी नियुक्त करणं देखील बंधनकारक आहे.


पिण्याचे पाणी (Drinking Water)


पेट्रोल पंपावर तुम्ही स्वच्छ पिण्याचे पाणी (Mineral Water) मोफत पिऊ शकता. पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी ही एक अत्यावश्यक अट आहे.


शौचालय सुविधा (Toilet Facility)


प्रत्येक पेट्रोल पंपावर महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. शौचालय वापरण्यासाठी पंपावरून इंधन घेणे बंधनकारक नाही. या सुविधेचा लाभ तुम्हाला मोफत मिळतो.


फोन सुविधा (Calling Facility)


जर तुम्ही आपात्कालीन (Emergency) परिस्थितीत अडकले असाल तर तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत फोन कॉल सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि कॉल करून पोलीस किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधू शकता. पेट्रोल पंपावर तुम्हाला लँडलाईन आणि मोबाईल फोन दोन्ही मिळू शकतात.


प्रथमोपचार पेटी(First-aid Kit)


पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी (First-aid Kit) ठेवणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये पट्टी, मलम तसेच पेनकिलर, पॅरासिटामॉल उपलब्ध असते, जे तुम्ही आपत्कालीन (Emergency) परिस्थितीत मोफत वापरू शकता.


अग्निशमन यंत्र (Fire Extinguisher) 


सर्व पेट्रोल पंपावर अग्निशमन यंत्र (Fire Extinguisher)असणे बंधनकारक आहे. पेट्रोल पंपावर अग्निशमन यंत्र मोठ्या प्रमाणात असतात, जेणेकरून कुठेही आग लागल्यावर त्याचा वापर करता येईल. ते वापरण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि तुम्हाला त्यासाठी ऑपरेटर देखील मिळेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Heat Wave: मे महिन्यात नागपूरसह विदर्भ तापणार; पुढील चार ते पाच दिवसात तापमान 43 अंशावर जाणार, हवामान विभागाचा अंदाज


Car loan Information:

Calculate Car Loan EMI