Trending News : तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये मुक्काम केला असेल. वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असता. काही हॉटेलमधील सोयीसुविधा आपल्याला खूप आवडतात. बहुतेक वेळेस आपण हॉटेल बुक करतो त्यावेळी आपल्याला वेगळं सांगण्यात येत पण प्रत्यक्ष हॉटेलमध्ये गेल्यावर वेगळंच चित्र पाहायला मिळतं. असंच काहीस एका व्यक्तीसोबत घडलं आहे. 


मुंबईतील एका व्यक्तीबाबत असंच काहीसं घडलं आहे. स्प्लिट रुम पाहून या व्यक्तीला धक्काच बसला. स्प्लिट एसी रूममध्ये खरोखरच एसी स्प्लिट म्हणजे दोन रुममध्ये विभागलेला होता. या व्यक्तीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत हा प्रकार समोर आणला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन रुमच्या मधोमध भिंतीमध्ये एसी बसवण्यात आला आहे. या एसीचा अर्धा भाग एका रुममध्ये तर इतर अर्धा भाग दुसऱ्या रुममध्ये आहे. या एसीचा वापर दोन्ही रुममधील लोक करु शकतात. हॉटेलने या स्प्लिट एसीसाठी लावलेला जुगाड पाहून हा व्यक्ती चांगलाच चक्रावला आणि त्याने हा फोटो ट्विटरवर शेअर केला.


हॉटेलचा भारी जुगाड






हॉटेल व्यवस्थापनाने खिशाला परवडेल आणि ग्राहकांची सोय व्हावी यासाठी हा भारी जुगाड केला आहे. हॉटेलमधील फोटो शेअर करत व्यक्तीने सांगितलं की, मुंबईत 2011 साली एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे मॅनेजरने स्प्लिट एसी रुम देतो, असे सांगितलं. प्रत्यक्ष पाहिल्यावर खरंच हा स्प्लिट एसी रुम होता. ज्यामध्ये एकच एसी दोन रुमच्या मधे बसवण्यात आला होता. इतकंच नाही तर दुसऱ्या रुममध्ये दोन प्रौढ व्यक्ती मोठ्या आवाजात सकाळी चार वाजेपर्यंत 'ए गणपत चल दारूला' गाणं वाजवत होते.


हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांना धम्माल प्रतिक्रिया आल्या आहेत. नेटकरी कमेंट करत आहेत. त्या व्यक्तीने पुढे सांगितलं की, रुममध्ये एसीचा रिमोट नव्हता. हॉटेल मॅनेजमेंटने आधीच एसी 24 वर सेट केला होता.


दरम्यान, एका नेटकऱ्याने दुसरा फोटो पोस्ट करत सांगितलं की, या हॉटेलमधील या रुमच्या दुसऱ्या बाजूच्या रुममध्ये मी ही एकदा थांबलो होतो.