Flying Car Viral Video : आत्तापर्यंत आपण सर्वांनीच रस्त्यावर धावणारी गाडी पाहिली आहे. मात्र, तुम्ही कधी आकाशात उडणारी गाडी पाहिली आहे का? त्याचबरोबर आकाशात कार उडवण्याचं (Flying Car) स्वप्न अनेकांनी पाहिलं असेल, पण येत्या काळात तुमचं हे स्वप्नही पूर्ण होणार आहे. चीनी तंत्रज्ञान (China) आणि इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Xpeng ने दुबईमध्ये आपल्या फ्लाइंग टॅक्सीची चाचणी केली आहे. चाचणी दरम्यान, कंपनीने आपल्या X2 फ्लाइंग कारचे पहिले यशस्वी उड्डाण केले. प्रवास आणि सार्वजनिक वाहतुकीच्या विकासात आपण ही एक मोठी संधी मानू शकतो.


आकाशात कारवर उडण्याचे स्वप्न साकार होणार
चीनमधील ग्वांगझू येथील XPeng Inc. च्या विमान संलग्न कंपनीने विकसित केलेली XPeng X2 कार ही जगभरातील उडणाऱ्या कार प्रकल्पांपैकी एक आहे. Xpeng Arrowhat चे महाव्यवस्थापक Minguan Qiu म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हळूहळू वाढवली जात आहे. उडणारी कार बनविणाऱ्या चीनी कंपनीने प्रथम दुबई शहर निवडले, कारण दुबई हे जगातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शहर आहे.


 







दुबईच्या आकाशात उडणारी टॅक्सी


X2 फ्लाइंग टॅक्सीच्या चाचणीदरम्यान काही लोकांना त्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर फ्लाइंग टॅक्सीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मात्र, या कारची आतापर्यंत केवळ चाचणी घेण्यात आली असून या उडत्या टॅक्सींना वाहतुकीच्या सेवेत आणण्यास वेळ लागेल. म्हणजे या एअर टॅक्सीमध्ये बसायचे असेल तर काही वर्षे वाट पाहावी लागेल.


उडणाऱ्या टॅक्सीचा वेग ताशी 130 किमी


मिळालेल्या माहितीनुसार, या दोन सीटच्या फ्लाइंग टॅक्सीचा वेग ताशी 130 किमी असेल. ही फ्लाइंग कॅब व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग (VTOL) क्षमतेने सुसज्ज आहे. X2 फ्लाइंग कार स्वायत्त उड्डाण क्षमतेसह इंटेलिजेंट फ्लाइट कंट्रोल सिस्टमसह सुसज्ज आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही उडणारी कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि शून्य कार्बन उत्सर्जित करते. आठ प्रोपेलरसह असणारी ही कार टेक-ऑफच्या वेळी 500 किलोपर्यंतचा भार वाहून नेऊ शकते.


भविष्यात लोकं रस्त्यावरील वाहतूक टाळतील.
सोमवारी फ्लाइंग कारचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी जुलै 2021 मध्ये मानवयुक्त उड्डाण चाचणी घेतली. अत्यंत शानदार पद्धतीने डिझाइन केलेली फ्लाइंग टॅक्सी एकाच वेळी दोन प्रवासी वाहून नेण्यास सक्षम आहे आणि आठ प्रोपेलरच्या संचाद्वारे चालविली जाते.